ग्रीन फ्रेंड्स ,अभाअंनिस व नेफडोतर्फे ‘प्रथम महिला शिक्षण दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:57+5:302021-01-08T05:53:57+5:30
प्रास्ताविक भाषणातून प्रा. अशोक गायधने यांनी सावित्रीबाई फुले यांच्या तसेच महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी नामदेव कान्हेकर ...
प्रास्ताविक भाषणातून प्रा. अशोक गायधने यांनी सावित्रीबाई फुले यांच्या तसेच महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी नामदेव कान्हेकर यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित स्वरचित काव्य सादर करून संबोधन केले. जे.एम.सी.चे उपमुख्य अभियंता अजय प्रताप सिंह यांनी व डॉ. मनोज आगलावे, अध्यक्ष दिनकर कालेजवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर माहिती दिली. डॉ.आगलावे, अजय प्रताप सिंग यांच्याहस्ते ग्रीन फ्रेंड्सतर्फे या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस, प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. संचालन ग्रीन फ्रेंड्स,अभाअंनिस व नेफडोचे अशोक वैद्य यांनी तर आभार प्रदर्शन आदित्य शहारे व दिलीप भैसारे यांनी केले.
कार्यक्रमाला साकोली आगार व्यवस्थापक गौतम शेंडे, लाखनी बसस्थानक वाहतूक नियंत्रक बी. एन. डहाके, छविल रामटेके,आशिष खेडकर, राहुल नान्हे, अर्णव गायधने, संकल्प वैद्य, रोशन बागडे, अयान रामटेके, वेदांत पंचबुद्धे, ओंकार चाचेरे, पंकज देशमुख,गौरेश निर्वाण, वज्रेश मेश्राम, भूषण धांडे, रोहित देशमुख,अमर रामटेके, दीप रामटेके, साहिल निर्वाण, प्रगती तरोणे यांनी सहभाग नोंदविला.