तलाव आटल्याने मासे मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:34 AM2019-06-01T00:34:59+5:302019-06-01T00:35:28+5:30
वाढत्या तापमानामुळे तलाव कोरडा पडल्याने त्यातील माशांचा तडफडून मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील गराडा येथे घडली. यात मत्स्यपालन संस्थेचे सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील गराडा (केसलवाडा) येथील ज्योती मत्स्यपालन सहकारी संस्थेने जिल्हा परिषदेचा तलाव मत्स्य उत्पादनासाठी लीजवर घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : वाढत्या तापमानामुळे तलाव कोरडा पडल्याने त्यातील माशांचा तडफडून मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील गराडा येथे घडली. यात मत्स्यपालन संस्थेचे सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तालुक्यातील गराडा (केसलवाडा) येथील ज्योती मत्स्यपालन सहकारी संस्थेने जिल्हा परिषदेचा तलाव मत्स्य उत्पादनासाठी लीजवर घेतला आहे. स्थानिक पंचायत समितीद्वारे २०१९ पर्यंतचा करारनामा करण्यात आला आहे. यात या संस्थेने मत्स्यबीज सोडले होते. माशांचा आकारही मोठा झाला होता. मात्र तापत्या उन्हामुळे हा तलाव कोरडा पडला. त्यामुळे या तलावातील शेकडो माशांचा तडफडून मृत्यु झाला. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मत्स्यपालन संस्थेने एका निवेदनातून दिली आहे. त्यात चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तसेच एक निवेदन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनाही देण्यात आल्या आहेत.
गराडा येथील हा तलाव जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असून ४७.५० हेक्टर क्षेत्रात पसरलेला आहे. तलावाशेजारी अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. शासनाद्वारे तलावाचे अद्यापही खोलीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसत आहे.