भंडारात ‘फिट इंडिया फ्रिडम रन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:51+5:302021-08-22T04:37:51+5:30
भंडारा : स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या स्वांतत्र्य सैनिकांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘आझादी का अमृत महाेत्सव’ उपक्रम ...
भंडारा : स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या स्वांतत्र्य सैनिकांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘आझादी का अमृत महाेत्सव’ उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत भंडारा येथे शनिवारी ‘फिट इंडिया फ्रिडम रन’चे आयाेजन करण्यात आले हाेते. यात अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नाेंदविला.
नेहरू युवा मंचच्यावतीने येथील महात्मा गांधी चाैकात या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पाेलीस अधीक्षक वंसत जाधव, नेहरू युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित हाेते. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी स्वातंत्र संग्रामावर पथनाट्य सादर करण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्वांना शपथ देण्यात आली. ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ या उपक्रमात शहरातील जवळपास दीडशे तरुण- तरुणी सहभागी झाले हाेते. गांधी चाैकातून सुरू झालेल्या या रनचा समाराेप छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात करण्यात आला. शहरातील अण्णा भाऊ साठे चाैक, मुस्लीम लायब्ररी चाैक, पाेष्ट ऑफीस चाैकातून ही रन काढण्यात आली.