कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर पाच जणावर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:21 AM2021-03-29T04:21:37+5:302021-03-29T04:21:37+5:30
रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तेढवा येथे आरोपीने आपल्या बहिणीच्या लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोक बोलाविल्यामुळे त्या घरमालकावर गुन्हा ...
रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तेढवा येथे आरोपीने आपल्या बहिणीच्या लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोक बोलाविल्यामुळे त्या घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी केली होती. कोणतेही सामाजिक अंतराचे पालन केले नव्हते. मास्क लावले नाही. पोलीस नायक खुशालचंद बर्वे यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, २६९, सहकलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छिपीया येथे लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी आढळल्याने कारवाई करण्यात आली. सामाजिक अंतराचे पालन केले नाही व मास्क न लावता गर्दी केल्याने पोलीस शिपाई नानाजी काटकर यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी कलम १८८, २६९ सहकलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आमगाव येथील लग्नाच्या स्वागत समारोहातही ५० पेक्षा जास्त लोक होते. लोकांनी मास्क लावले नाही किंवा शारीरिक अंतर ठेवले नाही. त्यामुळे पोलीस शिपाई सुरेंद्र लांजेवार यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास साहाय्यक फौजदार कन्नमवार करीत आहेत. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चावडी चौक छोटा गोंदिया येथील दोन दुकानदारांनी रात्री ८ वाजतानंतरही दुकान बंद न केल्यामुळे साहाय्यक फौजदार घनश्याम थेर यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.