पाच सराईत गुन्हेगार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 12:17 AM2017-06-18T00:17:30+5:302017-06-18T00:17:30+5:30
तुमसरातील पाच सराईत गुन्हेगारांवर तडिपारची कारवाई करण्यात आली. या कारवाईत भंडारा जिल्हा हद्दपारचा समावेश आहे.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसरातील पाच सराईत गुन्हेगारांवर तडिपारची कारवाई करण्यात आली. या कारवाईत भंडारा जिल्हा हद्दपारचा समावेश आहे. उर्वरित तीन जणांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत) कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील ही एकमेव कारवाई आहे.
तुमसर शहर संवेदनशील असून शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी याकरिता ही कारवाई करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यात तुमसरात गुन्ह्यात वाढ झाली होती. शहरातील रॉकी वासनिक (२५), छब्ब्या कटकवार (३०), प्रशांत धुर्वेे (३२) यांच्यावर २३ आॅक्टोबर २०१६ मध्ये दोन वर्षाकरिता तडीपारची कारवाई करण्यात आली.
तसेच डोडल्या हटवार (२८), आदित्य पांडे (२२) यांच्यावर १ जून २०१७ ला दोन वर्षाकरिता तडीपारची कारवाई करण्यात आली. भंडारा जिल्हा हद्दपारची कारवाईचा त्यात समावेश आहे. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाल ेयांनी सदर आदेश काढले. जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची पुराव्यानिशी शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.
एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कायद्या) अंतर्गत तीन जणांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. यात सतिष डहाट, संतोष दहाट तथा आशिष उर्फ छपरी गजभिये यांचा समावेश आहे. त्यांच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर गुन्हे तथा आर्म्स अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सदर कारवाई केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील ही एकमेव कारवाई आहे. तुमसरात मागील काही महिन्यापासून गुन्ह्यात वाढ झाली आहे. गुन्हा वाढीचे कारण पोलीस विभागाने वरिष्ठांना सादर केले. त्यानंतर गुन्हेगारावर संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
तुमसर शहर भंडारा जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. सध्या गुन्ह्यात या शहराने मोठ्या शहरांना मागे टाकल्याची धक्कादायक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीअंती कारवाईचे येथे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, गुन्हेगारांवर जबर बसावी, गुन्हेगारीवृत्तीला आळा बसावा हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. शहर अशांत करणाऱ्या असामाजिक तत्वांना डोके वर काढू न देणे हा प्रमुख उद्देश आहे. टोळी व हिंसात्मक कारवाई समाप्त होण्यास मदत होईल.
-विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर.