पाच गरजवंतांना घरकुलाच्या यादीतून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:44 AM2021-02-25T04:44:59+5:302021-02-25T04:44:59+5:30

घरकुलाच्या यादीत नाव नसल्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या ड यादीत तरी नावे समाविष्ट करण्यात यावीत, अशी मागणी अनेकदा वंचित ...

Five needy people were dropped from the household list | पाच गरजवंतांना घरकुलाच्या यादीतून वगळले

पाच गरजवंतांना घरकुलाच्या यादीतून वगळले

googlenewsNext

घरकुलाच्या यादीत नाव नसल्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या ड यादीत तरी नावे समाविष्ट करण्यात यावीत, अशी मागणी अनेकदा वंचित चिंतामण मिताराम तिबुडे, एकनाथ दसाराम शेंडे, विधवा महिला अनुसया ईशन चकोले, ताराचंद शेंडे, परमेश्वर तिबुडे या पाच गरजवंतांनी तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडे अर्ज देऊन केली.

घरकूल यादीतही नाव समाविष्ट करण्यात आले नाही. मात्र, एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश करण्यात आला. बाहेर गावात व शहरांत पक्क्या घरांत राहणाऱ्यांना घरकूल योजना मंजूर करण्यात आली. परंतु कच्च्या, मोडकळीस आलेल्या, घरावर ताडपत्री टाकून झोपडीत राहणाऱ्यांना घरकूल योजनांपासून वंचित ठेवण्यात आले. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करावी, अन्यायग्रस्त वंचितांना घरकूल योजना मंजूर करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

गरजवंतांना घरकूल मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. परंतु शासनाकडून घरकूल योजना मंजूर करण्यासंबंधीचे नवे प्रस्ताव मागविण्यात आलेले नसल्याने आमचा नाइलाज आहे. नवे प्रस्ताव मागविण्यात आल्यास प्राधान्याने विचार केला जाईल.

- प्रभाकर मोहतुरे, विद्यमान सरपंच, नवेगाव बुज.

Web Title: Five needy people were dropped from the household list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.