एकाच शिक्षकाचे पाचवेळा आदेश

By admin | Published: March 17, 2017 12:26 AM2017-03-17T00:26:17+5:302017-03-17T00:26:17+5:30

एका शिक्षकाची किमान पाच वेळा आदेश काढून जिल्हा परिषद प्रशासनाने विक्रम केला आहे. राजकीय

Five orders of the same teacher | एकाच शिक्षकाचे पाचवेळा आदेश

एकाच शिक्षकाचे पाचवेळा आदेश

Next

जि.प. प्रशासनाची तक्रार : नागपुरेंनी उपस्थित केला प्रश्न
तुमसर : एका शिक्षकाची किमान पाच वेळा आदेश काढून जिल्हा परिषद प्रशासनाने विक्रम केला आहे. राजकीय दबावापोटी जिल्हा परिषद प्रशासनाने ही कारवाई केली, असा आरोप करून संबंधित शिक्षकाचे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्र्याकडे लावून धरण्यात येईल, असा इशारा तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद शाळा परसवाडा (सि.) येथील पदवीधर शिक्षक ए.एम. हलमारे यांनी गैरवर्तणूक करून आपले कर्तव्यपालनात कसूर केल्याची तक्रार गटनेते हिरालाल नागपूरे यांनी केली होती. तुमसर पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेवून चौकशी करून कारवाई करण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला. त्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यात पदवीधर शिक्षक ए.एम. हलमारे दोषी आढळले. संबंधित अहवाल भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविण्यात आला.
ए.एम. हलमारे यांची प्रथम सिलेगाव सि. येथे बदली करण्यात आली. त्यानंतर लगेच सिलेगाव वरून पुन्हा परसवाडा सि. येथे स्थानांतरण करण्यात आले. तिसऱ्यांदा हलमारे यांना क्लिन चिट देण्यात आली. चवथ्यांदा जिल्हा परिषद प्रशासनाने पाचवेळा आदेश देवून विक्रम केला. सत्ताधारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव आणून ही कारवाई करण्यास भाग पाडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान नियमांचे भान ठेवून कारवाई करणे अपेक्षित होते. जिल्ह्यात ही कारवाई चर्चेची ठरली आहे.
याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री यांची नागपुरात भेट घेवून सविस्तर माहिती आपण देणार असून त्याबरोबरच विभागीय आयुक्त तथा शिक्षण मंत्र्यांकडे रितसर तक्रार करणार आहे. या संपूर्ण बदली, क्लिन चिट, निलंबन कारवाईची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी सांगितले. नियमाचंी अवहेलना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असे गटनेते नागपुरे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Five orders of the same teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.