महिला परिचरांच्या १० पैकी पाच मागण्या मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:50+5:302021-08-01T04:32:50+5:30

सोमवार, २६ जुलैपासून जिल्ह्यातील महिला परिचरांनी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष, संस्थापक पवन मस्के यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे ...

Five out of 10 demands of female attendants accepted | महिला परिचरांच्या १० पैकी पाच मागण्या मान्य

महिला परिचरांच्या १० पैकी पाच मागण्या मान्य

Next

सोमवार, २६ जुलैपासून जिल्ह्यातील महिला परिचरांनी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष, संस्थापक पवन मस्के यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला आदर्श युवा मंचने पूर्णत: पाठिंबा दिला आहे. तसेच जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाचाही इशारा दिला आहे. सदर आंदोलनात महिला परिचरांना किमान वेतन देण्यात यावे, महिला परिचरांना नियमित सेवेत कायम करावे, परिचरांना गणवेश व ओळखपत्र देण्यात यावे, कोविड भत्ता देण्यात यावे, परिचरांना व्यतिरिक्त मोबदला देण्यात यावे, पेन्शन योजना लागू करावे, दरवर्षी गणवेश व भाऊबीज देण्यात यावे, मासिक मानधन दर महिन्याला ५ तारखेच्या आत देण्यात यावे, चादर, बेडशिट, पडदे धुलाई भत्ता देण्यात यावा व कार्यक्षेत्रात फिरता प्रवास भत्ता देण्यात यावा, आदी १० मागण्या महिला परिचरांनी केल्या आहेत. चर्चेअंती पानझाडे यांनी पाच मागण्या लवकर पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. सदर मान्य करण्यात आलेल्या मागण्यांपैकी ओळखपत्र, मास्क व सॅनिटायझर देण्यात येईल, गणवेश देण्यात येईल, वागणुकीच्या बाबत पत्र देण्यात येतील, मानधनाच्या रकमेमध्ये जिल्हा वार्षिक निधीतून रक्कम वाढचे प्रस्ताव दाखल करण्यात येतील, आदी मागण्या मान्य करण्यात आल्या. उर्वरित मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के, सविता हटवार, माधुरी चोले, वीणा टिचकुले, चंदा नदानवार, स्नेहलता रामटेके, प्रेमलता मेश्राम, कविता उईके, मीना डोमळे, अंजू रामटेके, अंजू वैद्य, संगीता नगरकर, धमावती नंदेश्वर, सिंधू खोटेले, चित्रा तिरपुडे, निरुता कोचे, दुर्गा गजबे, हिरा भेंडारकर आदी महिला परिचर तसेच आदर्श युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Five out of 10 demands of female attendants accepted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.