भंडारा जिल्ह्यात दुर्मिळ जातीची पाच कासवे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:21 AM2019-03-16T10:21:19+5:302019-03-16T10:21:40+5:30
तस्करी करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदिस्त करून ठेवलेली ५ कासवे वन विभागाने शनिवारी सकाळी एका घरातून जप्त केली. ही कारवाई मोहाडी तालुक्याच्या करडी येथे करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तस्करी करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदिस्त करून ठेवलेली ५ कासवे वन विभागाने शनिवारी सकाळी एका घरातून जप्त केली. ही कारवाई मोहाडी तालुक्याच्या करडी येथे करण्यात आली.
निळकंठ गोविंदा रहमतकर (४८) असे आरोपीचे नाव आहे. कासवाला लक्ष्मीचे वाहन संबोधल्या जात असल्याने गुप्तधन शोधणारे अशा कासवाच्या शोधात असतात. तुमसर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शनिवारी सकाळी करडी येथे एका घरावर धाड मारण्यात आली. त्यावेळी स्टीलच्या ड्रममध्ये पाच कासव बंदिस्त आढळून आले. पाचही कासव जप्त करण्यात आले. सदर कासवे दुर्मिळ प्रजातीचे असून ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आरोपीला वन विभागाने अटक केली असून यात आणखी कोणी सहभागी आहेत का याचा शोध घेतला जात आहे.