पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात गुणात्मक परिवर्तन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:02 AM2019-08-04T01:02:46+5:302019-08-04T01:03:48+5:30

गत पाच वर्षात माझ्या सरकारने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व बेरोजगारांसाठी मोठी कामे केली. शेतकऱ्यांना भरीव मदत दिली. गतवर्षी धानाला ५०० रुपये बोनस दिला. पुढील वर्षीही ५०० रुपये बोनस देण्यात येईल. उद्योगात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणले असून शिक्षणात राज्य तिसºया क्रमांकावर आहे.

In five years, the state of Maharashtra underwent qualitative change | पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात गुणात्मक परिवर्तन केले

पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात गुणात्मक परिवर्तन केले

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस। तुमसर येथे महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गत पाच वर्षात माझ्या सरकारने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व बेरोजगारांसाठी मोठी कामे केली. शेतकऱ्यांना भरीव मदत दिली. गतवर्षी धानाला ५०० रुपये बोनस दिला. पुढील वर्षीही ५०० रुपये बोनस देण्यात येईल. उद्योगात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणले असून शिक्षणात राज्य तिसºया क्रमांकावर आहे. आमच्या सरकारने पाच वर्षात राज्यात गुणात्मक परिवर्तन केले असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा माणण्यासाठी काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा शनिवारी तुमसर शहरात पोहचली. त्यावेळी या यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, माजी खासदार शिशुपाल पटले, नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, नगरपरिषद उपाध्यक्ष कांचन कोडवानी, गीता कोंडेवार, बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, डॉ.मधुसुदन गादेवार, जयप्रकाश भवसागर, मनोज सुखानी यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०२१ पर्यंत राज्यातील प्रत्येकाला घर देण्यात येणार आहे. वृद्धापकाळ योजनेत ६०० रुपयावरून १२०० रुपये मानधन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजपा सेनेचे सरकार उभे आहे. ४२ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली.
सभेला सुनील लांजेवार, बाबू ठवकर, अनिल जिभकाटे, निशिकांत इलमे, गौरव नवरखेले, क्षीतीज भुरे, विक्रम लांजेवार, नगरसेवक राजा लांजेवार, मुन्ना पुंडे, प्रशांत खोब्रागडे, राजेश खोब्रागडे, विरेंद्र अंजनकर, ललीत शुक्ला, ललीत थानथराटे आदी उपस्थित होते.

Web Title: In five years, the state of Maharashtra underwent qualitative change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.