देव्हाडी उड्डाणपुलाजवळ फ्लायअ‍ॅशचा थर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:23 PM2018-11-12T22:23:14+5:302018-11-12T22:23:41+5:30

उड्डाण पूल भरावातील पाण्यासोबत वाहून आलेली फ्लायअ‍ॅश तुमसर-गोंदिया राज्य मार्गाशेजारी चार महिन्यांपासून पडून आहे. भरधाव वाहनांमुळे अ‍ॅशचा मोठा धुराळा उडतो. ही राख आरोग्यास अपायकारक असतांनाही कंत्राटदाराने ती उचलली नाही. संबंधित अधिकाºयाचे दुर्लक्ष होत आहे.

Flat ash layer near Devadi Flyover | देव्हाडी उड्डाणपुलाजवळ फ्लायअ‍ॅशचा थर

देव्हाडी उड्डाणपुलाजवळ फ्लायअ‍ॅशचा थर

Next
ठळक मुद्देआरोग्यास अपायकारक : चार महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : उड्डाण पूल भरावातील पाण्यासोबत वाहून आलेली फ्लायअ‍ॅश तुमसर-गोंदिया राज्य मार्गाशेजारी चार महिन्यांपासून पडून आहे. भरधाव वाहनांमुळे अ‍ॅशचा मोठा धुराळा उडतो. ही राख आरोग्यास अपायकारक असतांनाही कंत्राटदाराने ती उचलली नाही. संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे.
देव्हाडी येथे उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. फाटकाच्या दोन्ही बाजुला अ‍ॅप्रोच पूलावर वीज कारखान्यातील फ्लायअ‍ॅशचा भराव करण्यात येत आहे. पावसाळ्यात दगडी पुलातून पाण्यासह राख पोच मार्गावर वाहून आली. सदर राख मागील चार महिन्यांपासून रस्त्याशेजारी व रस्त्यावर पडून आहे. फ्लायअ‍ॅशचा मोठा थर जमा झाला आहे. पोचमार्ग अरुंद असल्याने मोठी- लहान वाहने राखेवरुन जातात. त्यामुळे राखेचा धुराळा दिवसभर उडत असतो. आरोग्यास अत्यंत अपायकारक अशी ही राख नागरिकांच्या आजाराला आमंत्रण देत आहे.
राख हवेत उडू नये म्हणून पोच मार्गावर पाणी शिंपडले जाते. परंतु मागील आठ दिवसांपासून पाणी शिंपडने बंद आहे. धुराळ्यात समोरचे वाहनही दिसत नाही. अंधुक प्रकाशात वाहने चालवावी लागतात. तुमसर- गोंदिया हा प्रमुख राज्यमार्ग आहे. येथे वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळेच येथे उड्डाणपूल मंजूर करण्यात आला. पोचमार्गाने जाताना जीव धोक्यात घालून येथे मार्गक्रमन करावे लागते. पोच मार्ग खड्डेमय झाला आहे. याकडेही दुर्लक्ष होत आहे. कंत्राटदाराने सर्व नियम धाब्यावर बसविल्याचे दिसत आहे.
सदर रस्त्याने अनेक महत्वाचा व्यक्ती मार्गक्रमन करतात, अधिकारीही जातात. परंतु कुणाला याची दखल घेण्याची गरज वाटली नाही. पोचमार्ग काटकोण त्रिकोणात तयार केला आहे. खापा मार्गाने येणाºया वाहनाला प्रथम पोचमार्ग दिसत नाही. नेमका वळणावर मोठा खड्डा आहे. जड वाहनांना येथे तारेवरची कसरत करावी लागते. परंतू या सर्व प्रकाराकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

उड्डाणपूलाजवळील राख त्वरित उचलावी, रस्त्यावर पाणी शिंपडावे तसेच पोचमार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी आपण तहसीलदार व उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देणार आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.
-स्रेहल रोडगे,
सामाजिक कार्यकर्ता माडगी

Web Title: Flat ash layer near Devadi Flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.