कोट्यवधींच्या सदनिका रिकाम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:56+5:30
तुमसर शहराच्या पूर्वेला शिवाजी नगरात मध्यवर्तीस्थानी १८ सदनिका आहेत. येथील बांधकाम दर्जेदार असून प्रशस्त अशा सदनिका आहेत. मागील दहा वर्षापूर्वी सदनिकांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर सुरुवातीच्या काळात काही वर्षे येथे कर्मचारी व अधिकारी वास्तव्यासही होते. त्यानंतर सदनिका रिकाम्याच आहेत. सातत्याने दुर्लक्ष झाल्यानंतर देखभालीसाठी कुणीही दखल घेतली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : एकीकडे कर्मचारी व अधिकाऱ्यांना वास्तव्याकरिता सदनिका मिळत नाही, परंतु तुमसर येथील दूरसंचार विभागाच्या कोट्यवधींच्या सदनिका शहराच्या मध्यभागी असूनही रिकाम्या पडून आहेत. सदनिका परिसरात लहान मोठी झाडे वाढली आहेत. खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. संबंधित विभागाने कर्मचारी वर्ग पूर्वीसारखा नाही. त्यामुळे सदनिका भाडे तत्वावर देण्याची गरज आहे.
तुमसर शहराच्या पूर्वेला शिवाजी नगरात मध्यवर्तीस्थानी १८ सदनिका आहेत. येथील बांधकाम दर्जेदार असून प्रशस्त अशा सदनिका आहेत. मागील दहा वर्षापूर्वी सदनिकांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर सुरुवातीच्या काळात काही वर्षे येथे कर्मचारी व अधिकारी वास्तव्यासही होते. त्यानंतर सदनिका रिकाम्याच आहेत. सातत्याने दुर्लक्ष झाल्यानंतर देखभालीसाठी कुणीही दखल घेतली नाही.
तुमसर तालुका मुख्यालयात दूरसंचार विभागात केवळ तीन कर्मचारी असल्याची माहिती आहे. येथील काही कर्मचाऱ्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने सदर कर्मचारी आता त्या प्रमाणात कार्यरत नाही. तर काहींनी स्वत:चे घर बांधले. त्यामुळे सदनिकेत कुणीच वास्तव्याला नाहीत.
कोरोना लॉकडाऊनपूर्वी स्थानिक पोलीस प्रशासनाने संबंधित विभागाकडे सदनिका भाड्याने देण्याची परवानगी मागितली. परंतु कोरोना काळात सदर प्रक्रिया थांबली. पुढे प्रक्रिया वरिष्ठ अधिकाºयांकडून पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदनिकेत कुणीच राहत नाही. सदनिका आवारात लहान मोठी झाडे वाढली आहेत. टवाळखोरांनी सदनिकांच्या खिडक्यांची तावदाने दगडाने फोडली आहेत. कोट्यवधींच्या सदनिका अशाच राहिल्या तर मोडकडीस येण्यास वेळ लागणार नाही.परंतु सध्या कुणाचेही लक्ष याकडे नाही.
तुमसर येथील सदनिकांची स्थिती उत्तम आहे. कर्मचारी संख्या कमी असून येथे सध्या कुणी राहत नाही. पोलीस विभागाने सदनिका भाड्याने मागितल्या आहेत. याचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील.
- संदीपकुमार सिम्पलेकर,
दूरसंचार विभाग भंडारा