पिण्याच्या पाण्यासाठी पैशाचा महापूर

By admin | Published: June 20, 2016 12:24 AM2016-06-20T00:24:10+5:302016-06-20T00:24:10+5:30

उकाड्याच्या दिवसात शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्याची सवय असणाऱ्यांना ठंड पाणी पिल्याशिवाय पर्याय उरत नाही.

Flood of money for drinking water | पिण्याच्या पाण्यासाठी पैशाचा महापूर

पिण्याच्या पाण्यासाठी पैशाचा महापूर

Next

तहान झाली महाग : बाटलीबंद पाण्यासाठी कोट्यवधींचा खर्च, घरोघरी पोहोचविले जात आहे बाटलीबंद पाणी
लाखांदूर : उकाड्याच्या दिवसात शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्याची सवय असणाऱ्यांना ठंड पाणी पिल्याशिवाय पर्याय उरत नाही. यासाठी मनसोक्त पैशाची उधळण केली जाते. बाटलीबंद पाण्याची मागणी सर्वाधिक आहे. परंतु बाटली कोणत्या कंपनीची आहे याकडे दुर्लक्ष केल्या जाते.
‘चिल्ड’ हा शब्द आवर्जून तहानलेल्यांच्या तोंडात घर करून बसला असल्याने दुकानदारही मान्यता नसलेल्या किंवा जास्त कमीशन मिळेल त्या बाटल्यांचा गोरखधंदा बिनधास्तपणे करीत आहेत.
लाखांदूर तालुक्यासह साकोली, सानगडी, वडसा, पवनी या ठिकाणी बाटलीबंद पाण्याचा वापर जोमात होतो. दररोज तालुक्यात २,५०० हजार बाटल्यांची विक्री होत असल्याची माहिती एका उद्योजकाने दिली. यासाठी एका दिवसाकाठी ५० हजार रुपये पाण्यासाठी खर्च होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाण वाढल्याने दररोज पिण्याचे पाणी नाकारून नागरिक रिस्क घेण्यापेक्षा बाटलीबंद शुद्ध आणि स्वच्छ पाणी वापरण्याला प्राधान्य देतात. मात्र सर्वांनाच पाणी विकत घेऊन पिण्यासाठी परवडत नाही. शासकीय यंत्रणेत पिण्याच्या पाण्यासाठी पैशाची तरतूद नसली तरीही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलावर बॉटल असतात.
कपाटात बॉक्स असतात. कोणतीही बैठक असो. मेळावा असो किंवा कार्यशाळा असो. यासाठी हजारो रुपये पाण्याच्या बाटलीसाठी राखीव ठेवलेले असतात.
कधी यातीलच बाटल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरी पोहचत्या गेल्या जातात. एका दिवसात लाखांदूर तालुक्यात २,५०० बाटल्या विकल्या जातात. त्यासाठी ५० हजार रुपये खर्च, महिन्याकाठी १५ लाख रुपये तर वर्षाला जवळपास १ कोटी ८० लक्ष रुपये निव्वळ बाटलीबंद पिण्याच्या पाण्यासाठी खर्च होतो.
बसस्टँड, हॉटेल्स, बियर बार, मंगल कार्यालये, शासकीय कार्यालय, कार्यक्रम, दवाखाने, पार्ट्या आदी ठिकाणी बाटलीबंद पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कोणत्याही शासकीय यंत्रणेचा आपल्या पाणी पुरवठ्यावर विश्वास नाही. पूर्वी कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर किंवा अधिकाऱ्यांच्या टेबलावर पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र असायचे.
आता प्रत्येक कार्यक्रमात आणि टेबलवर पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. शुद्ध पाण्याची गरज फक्त अधिकारी किंवा श्रीमंत वर्गालाच आहे काय? बाटलीबंद पाणी विकत घेऊन पिण्याची क्षमता नाही. त्यांना शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार नाही काय? नागरिकांना पुरवत असलेले पाणी इतके अशुद्ध आहे काय? याची उत्तरे ग्रामपंचायत व पदाधिकाऱ्यांनी देण्याची गरज आहे.
बाटलीबंद पाणी पिल्यानंतर रिकाम्या बाटल्यांच्या प्रदुषणाला प्रश्न भविष्यात गंभीर परिणाम सामान्य नागरिकास भोगावयास नक्कीच भाग पाडणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)

१५ प्रकारचे ब्रॅन्ड
लाखांदूर तालुक्यात किमान १५ ब्रॅन्डचे पाणी विकले जाते. अनेक उद्योग समूह बाटलीबंद पाणी निर्माण करीत आहेत. त्यावर संबंधित विभागाचे कसलेच निर्बंध नाही अन्न व औषधी प्रशासनाला पाण्च्याचा संबंध अन्नाशी आहे याचे पलीकडे दुसरी माहिती नाही. या पाण्याच्या अधुनमधून तपासण्या करणे आवश्यक आहे.

Web Title: Flood of money for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.