जिल्ह्यातील १३० गावांना पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:00 AM2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:01:00+5:30

भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा, चुलबंध, सूर, कन्हान, बावनथडी या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नद्या व नाल्या आहेत. पावसाळा आला की या नद्यांना पूर येतो. त्याचा फटका शेतीपिकांसह नदीतिरावरील गावांना बसतो. जिल्ह्यात १५४ गावे नदी तिरावर असून त्यापैकी १३० गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. यात भंडारा तालुक्यात नदी तिरावर ३८ गावे असून त्यापैकी २७ गावांना पूराचा धोका आहे.

Flood threat to 130 villages in the district | जिल्ह्यातील १३० गावांना पुराचा धोका

जिल्ह्यातील १३० गावांना पुराचा धोका

Next
ठळक मुद्देउपाययोजनांकडे दुर्लक्ष : पूर आला की रात्र काढावी लागते जीव मुठीत घेवून

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विशालपात्र असलेल्या वैनगंगा नदीसह इतर नदी-नाल्यांच्या तीरावर जिल्ह्यातील तब्बल १३० गावांना पूराचा कायम धोका आहे. उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अतिवृष्टी झाली की या गावातील नागरिकांना जीव मुठीत घेवून रात्र काढावी लागते. जिल्ह्यात वैनगंगेच्या तीरावर ९९ गावे असून त्यापैकी ८३ गावांना कायम धोका असतो.
भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा, चुलबंध, सूर, कन्हान, बावनथडी या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नद्या व नाल्या आहेत. पावसाळा आला की या नद्यांना पूर येतो. त्याचा फटका शेतीपिकांसह नदीतिरावरील गावांना बसतो. जिल्ह्यात १५४ गावे नदी तिरावर असून त्यापैकी १३० गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. यात भंडारा तालुक्यात नदी तिरावर ३८ गावे असून त्यापैकी २७ गावांना पूराचा धोका आहे. मोहाडी तालुक्यात १९ गावे नदीतिरावर असून १७ गावांना पुराचा धोका असतो. तुमसरमधील, २४ पवनी ३३, साकोली तीन, लाखांदूर तालुक्यातील २८ पैकी १८ आणि लाखनी तालुक्यातील ११ पैकी नऊ गावांना पुराचा धोका आहे.
वर्षानुवर्ष ही गावे नदीच्या तीरावर आहेत. रेडझोनमधील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी उंचावर असलेल्या गावांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. मात्र या गावांना अतिवृष्टी झाली की पुराचा धोका असतो. वैनगंगा, चुलबंद, सूर या नद्यांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. अनेक गावातील नदीतिरावरील घरांचे पुनर्वसन केले तरी प्रश्न सुटू शकतो. परंतु या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नाही. तुमसर तालुक्यातील काही गावात तर नदीपात्र गावाच्या दिशेने येत आहे. भुस्खलन होत असल्याने तेथे धोका कायम असतो. प्रशासनाने पूरबाधित रेड आणि ब्ल्यु झोनमधील गावांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.
भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पांमुळेही अनेक गावात समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यात प्रकल्पाच्या पाण्यात वाढ झाली की, अनेक गावांत वैनगंगेचे पाणी शिरते. पुनर्वसनाच्या समस्या कायम आहेत. नदी तीरावरील गावे आणि गोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे प्रभावी होणाऱ्या गावातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नावर अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र प्रशासनाने पुरबाधित गावांचा प्रश्न कधीच सोडविला नाही. त्यामुळे पावसाळा आला की, या गावातील नागरिकांना जीव मुठीत घेवून रात्र काढावी लागते. घरांचे होणारे नुकसानही सहन करावे लागते.

सर्वाधिक गावे वैनगंगेच्या तीरावर
भंडारा जिल्ह्यातून वाहनाºया वैनगंगा नदीच्या तीरावर सर्वाधिक ९९ गावे आहेत. त्यापैकी ८३ गावांना पुराचा कायम धोका असतो. चुलबंद नदीच्या तिरावरील ३१ पैकी २१, सूर नदीच्या ११ पैकी सात, कन्हान नदीच्या चार पैकी तीन आणि बावनथडी नदीच्या नऊ पैकी नऊ गावांना पूराचा कायम धोका असतो. पवनी तालुक्यातील वैनगंगेच्या तिरावरील ३३ गावे रेडझोनमध्ये आहेत.
पुनर्वसनानेच प्रश्न सुटू शकतो
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा, चुलबंद, सुर व इतर नदीतीरावरील गावांत पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गावात आणि घरात पूर शिरल्यानंतर संपूर्ण परिसर चिखलमय होऊन जातो. त्यामुळे आजाराची समस्या उद्भवते. घरांची डागडुजी करताना दरवर्षी मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. या सर्व प्रश्नांवर एकच उपाय तो म्हणजे नदी तीरावरील गावांचे पुर्णत: किंवा अंशत: पुनर्वसन करणे होय.
 

Web Title: Flood threat to 130 villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.