महामार्गावर चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 10:18 PM2017-08-14T22:18:52+5:302017-08-14T22:19:19+5:30
सुकाणू समिती व प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने सोमवारला शेतकºयांच्या मागण्यांना घेऊन राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सुकाणू समिती व प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने सोमवारला शेतकºयांच्या मागण्यांना घेऊन राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रानुसार मंगळवारला स्वातंत्र्यदिनी लोकप्रतिनिधींना ध्वजारोहणापासून रोखण्यात येईल, असा इशारा दिला आहे. शेतकºयांच्या मागण्या प्रलंबित असतानाही शासनाने त्या गंभीरपणे घेतलेल्या नाही. प्रहार संघटनेने सोमवारला संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश पाखमोडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला.
शेतकºयांना कर्जमुक्त करावे, शेतमालाला हमीभाव द्यावा, शेती मालावरील निर्यातबंदी हटवावी, स्वामिनाथन आयोगाची अंमल बजावणी करावी, गायीच्या दुधाला ५० रूपये व म्हशीच्या दुधाला ६५ रूपये हमीभाव द्यावा, शेतकºयांची भाकड जनावरे शासनाने खरेदी करावी, शेतकºयांच्या पाल्यांना मोफत शिक्षण द्यावे, सुकानू समितीने सादर केलेल्या मागण्यांमध्ये समावेश आहे. आंदोलनात राजेश पाखमोडे, चारूल रामटेके, मंगेश वंजारी, विजय गिरेपुंजे, सुभाष हटवार, महेंद्र पोगडे, जितेंद्र साकोरे, रवी मने, सुयोग मेश्राम, दिलीप बडोले, किरण मेंढे, सुशिकला सेलोकर, यमुना वंजारी, सोना मेश्राम, रेखा मेश्राम कार्यकर्ते सहभागी होते.