उड्डाणपुलाचे होणार हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:01:01+5:30
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूल भरावात राख घातली गेली. मागील तीन वर्षापासून पावसाळ्यात भरावातील राख वाहून जात आहे. त्यामुळे पूलावर मोठे खड्डे पडले होते. पूलात पोकळी निर्माण झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. राख बाहेर पडू नये म्हणून दगडातील गॅपमध्ये सिमेंट भरण्यात आले. परंतु ही तात्पूरती सोय आहे. कायमस्वरूपी तोडगा अद्याप येथे निघाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी उड्डाणपुलाच्या सदोष बांधकामावर बांधकाम विभागाने आक्षेप घेतला असून दिल्ली येथील तज्ञांच्या पथकाने अंतीम ंजुरी दिल्यानंतरच उड्डाणपुलाचे हस्तांतरण होणार असल्याची माहिती आहे. मागील तीन वर्षापासून पावसाळ्यात पुलातील दगडांतून भरावाची राख मोठ्या प्रमाणात बाहेर निघत आहे. त्यामुळे पुलावर खड्डे पडले आहे. याची दखल बांधकाम विभागाने घेतली आहे.
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूल भरावात राख घातली गेली. मागील तीन वर्षापासून पावसाळ्यात भरावातील राख वाहून जात आहे. त्यामुळे पूलावर मोठे खड्डे पडले होते. पूलात पोकळी निर्माण झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. राख बाहेर पडू नये म्हणून दगडातील गॅपमध्ये सिमेंट भरण्यात आले. परंतु ही तात्पूरती सोय आहे. कायमस्वरूपी तोडगा अद्याप येथे निघाला नाही.
राज्य शसनाने येथे २५ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी कंत्राटदाराला सुमारे १९ कोटी रूपये देण्यात आले. हस्तांतरण केल्याशिवाय उर्वरित रक्कम येथे थांबवून ठेवण्यात आली. कंत्राटदाराचा दिल्ली येथील एका कंपनीशी करार होता. त्यांच्या निर्देशानुसारच पुलाचे बांधकाम करण्यात आले. राख निघण्याच्या कारणांचा शोध सदर कंपनीही घेत आहे. पूल भरावातील राख वाहून जात असल्याप्रकरणी बांधकाम विभाग सावध भूमिकेत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल
तीन वर्षांपासून भरावातील राख सतत निघत आहे. हे धोक्याचे आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने दिल्ली येथील तज्ञांच्या पथकाला पाचारण केले, परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तज्ञांचे पथक सदर पूलाची पाहणी करून अहवाल देतील. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
यंत्राने करणार पाहणी
पुलात सुमारे १४ हजार दगडांचा उपयोग करण्यात आला आहे. राख कुठून निघत आहे. त्याची कारणे आदींचा शोध विशिष्ट यंत्राने घेण्यात येणार आहे. संपूर्ण पूलातून राख निघत असल्याने संपूर्ण पूलाची तळापासून पाहणी केली जाणार आहे.