मुलांना प्रेरीत करण्यावर भर द्या

By admin | Published: January 25, 2017 12:42 AM2017-01-25T00:42:49+5:302017-01-25T00:42:49+5:30

विद्यार्थी दशेत मुलांवर प्रचंड ताण असतो. शाळा, घर यासोबतच शिकवणीवर्गाचा भारही त्यांना सतावत असतो.

Focus on motivating the kids | मुलांना प्रेरीत करण्यावर भर द्या

मुलांना प्रेरीत करण्यावर भर द्या

Next

विनिता साहू यांचे प्रतिपादन : सेंट मेरीस शाळेचे दहावे वार्षिक स्नेहसंमेलन
भंडारा : विद्यार्थी दशेत मुलांवर प्रचंड ताण असतो. शाळा, घर यासोबतच शिकवणीवर्गाचा भारही त्यांना सतावत असतो. अशावेळी त्यांच्यावर दबाव न देता त्यांना प्रेरीत करा. विद्यार्थ्यांना आवडेल त्या दिशेत त्यांना जावू द्या. आवडत्या क्षेत्रात ते नक्कीच यशस्वी होतील, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.
खात रोड स्थित सेंट मेरीस शाळेच्या दहाव्या वार्षिक स्रेहसंमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालन बेबी थॉमस, प्राचार्य नरगिस काझी, सचिव बेटशी शिजो उपस्थित होते. दिप प्रज्वलन करुन तथा विद्यार्थ्यांच्या अप्रतिम स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बेटशी शिजो यांनी उपस्थित पाहूण्यांचा अल्प परिचय करुन दिला. प्रास्ताविक तथा अहवालातून प्राचार्य काझी यांनी शाळेची गौरवशाली परंपरा, विद्यार्थ्यांचे सुयशाबाबद मार्गदर्शन केले. विनिता साहू म्हणाल्या, विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच खरे मार्गदर्शक शिक्षकांच्या रुपातून मिळत असते. ज्वॉय आॅफ गिव्हींग च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्याला काहीतरी देण्याची भावना निर्माण होते. थेंबाथेंबातून जसा समृद्र निर्माण होते. तशीच भावनाही मुलांमध्ये निर्माण व्हायला हवी ग्रामीण क्षेत्रातून आलेली मुलही आॅल्मपीयाड मध्ये झेप घेतात. ही खरच वाखणण्याजोगी बाब आहे. बेबी थॉमस यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्याना तसेच पालकांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
व्यंजन बनविण्याच्या स्पर्धेत रामा गजभिये, विजया कावळे, रांगोळी स्पर्धेत शुभांगी भिवगडे व कांचन भादुरी, आॅल्म्पीयाड स्पर्धेतील सिध्दी पडोळे, प्रणय धुर्वे, आदीत्य सेलोकर, प्रतिक्षा धुर्वे, अनुराग कटकवार, मधुरा कावळे, समृध्दी इंगोले या विद्यार्थ्यांनी तर पालकांमधून क्रिकेट स्पर्धेतील विलास बिलवणे, हाके, कैलाश फुलझेले, राठोड, पंकज बडवाईक, सुरेश घोडे, जय आकरे, सतगुरु पाचे, मोहम्मद अली, सुनिल चव्हाण, राजेश तरोणे, रमेश सिंगणजुडे यांना सन्मानित करण्यात आले. संगीत शिक्षिका रेखा पटले यांचे गायन सर्वांना मोहित करून गेले.
संचालन याना मसी व दिपा प्रधान यांनी केले. आभार प्रदर्शन शुभांगी पडोळे हिने मानले. यावेळी आयोजित सांस्कृतिक स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांनी समृह नृत्य सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली. त्यांच्या नृत्याने उपस्थित पालकांनाही जागेवरच खिळवून ठेवले. (प्रतिनिधी)

Web Title: Focus on motivating the kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.