कृषि विज्ञान केंद्राने माती परिक्षणावर भर द्यावा -दाणी
By admin | Published: December 24, 2015 12:42 AM2015-12-24T00:42:00+5:302015-12-24T00:42:00+5:30
शेतावर फिरत्या माती परिक्षण प्रयोगशाळेद्वारे मातीचे परिक्षण करुन शेतकऱ्यांना बदलत्या हवामान परिस्थितीनुरुप आवश्यक मार्गदर्शन करावे,..
भंडारा : शेतावर फिरत्या माती परिक्षण प्रयोगशाळेद्वारे मातीचे परिक्षण करुन शेतकऱ्यांना बदलत्या हवामान परिस्थितीनुरुप आवश्यक मार्गदर्शन करावे, अशा सूचना पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. रवीप्रकाश दाणी यांनी दिल्यात.
साकोली येथील कृषि विज्ञान केंद्राला डॉ. दाणी यांनी नुकतीच भेट देवून येथील कामांचा आढावा घेतला. तसेच कृषि विज्ञान केंद्र व संशोधन केंद्र प्रक्षेत्रावर पाहणी करुन केंद्राच्या कार्याविषयी प्रगती जाणून घेतली.
कृषि विज्ञान केंद्र्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार यांनी केंद्राचे उद्दीष्टानुसार चालू असलेल्या कामाचे चलचित्राद्वारे सादरीकरण केले. यावेळी डॉ. दाणी यांनी प्रक्षेत्रावर धान संशोधन कायार्ची पाहणी करुन उपस्थित शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पुढील कार्याकरीता शुभेच्छा दिल्यात. (नगर प्रतिनिधी )