कोरोना संक्रमण प्रतिबंधासाठी शासन निर्देशाचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:40 AM2021-02-20T05:40:46+5:302021-02-20T05:40:46+5:30

कोरेटी म्हणाले, राज्यात संभाव्य कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने राज्य शासनाने नुकतेच या आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य प्रशासनासह पोलीस प्रशासनाला ...

Follow government guidelines for corona infection prevention | कोरोना संक्रमण प्रतिबंधासाठी शासन निर्देशाचे पालन करा

कोरोना संक्रमण प्रतिबंधासाठी शासन निर्देशाचे पालन करा

Next

कोरेटी म्हणाले, राज्यात संभाव्य कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने राज्य शासनाने नुकतेच या आजाराच्या प्रतिबंधासाठी आरोग्य प्रशासनासह पोलीस प्रशासनाला दंडात्मक कारवाईसह फौजदारी कारवाईचे निर्देश दिले आहेत. सदर निर्देशानुसार तालुक्यातील मंगल कार्यालयात यापुढे लग्न अथवा अन्य समारंभ आयोजित करताना ५० पेक्षा अधिक नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. तसे न झाल्यास शासन निर्देशानुसार संबंधित मंगल कार्यालय चालकाविरोधात दंडात्मक कार्यवाहीसह सील करण्याचे शासन निर्देश आहेत. खाजगी शिकवणी वर्गात देखील प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क अनिवार्य असून त्यामध्ये देखील शासन निर्देशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित शिकवणी वर्ग सील करून बंद पाडण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात तालुक्यातील सर्वांनीच तोंडाला मास्क लावणे अनिवार्य असून विशेषत: तालुक्यातील सर्वच वाहन चालकांनी तोंडाला मास्क लावूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तथापि या निर्देशाचे कोणी पालन न करता उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधिताविरोधात दंडासह फौजदारी कारवाईचे निर्देश शासनाने निर्गमित केले असल्याचे देखील सांगितले.

एकंदरीत तालुक्यातील सर्व जनतेने व नागरिक, विद्यार्थ्यांनी या आजाराच्या प्रतिबंधासाठी व लॉकडाऊनपासून बचावासाठी गतवर्षीप्रमाणे आतादेखील शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करून दंडात्मक व पोलीस कारवाईपासून बचाव करण्याचे आवाहन ठाणेदार मनोहर कोरेटी यांनी केले आहे.

Web Title: Follow government guidelines for corona infection prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.