सिनेस्टाईल पाठलाग करून चोरीचा टिप्पर पकडला

By admin | Published: December 25, 2015 01:33 AM2015-12-25T01:33:58+5:302015-12-25T01:33:58+5:30

तिरोडा गुमाधावडा येथील एक टिप्पर अज्ञात चोरटे तुमसरमार्गे पळवून नेत असल्याची माहिती भंडारा पोलिसांकडून तुमसर पोलिसांना मध्यरात्री मिळाली.

Following the Cinestyle, the theft tipper caught | सिनेस्टाईल पाठलाग करून चोरीचा टिप्पर पकडला

सिनेस्टाईल पाठलाग करून चोरीचा टिप्पर पकडला

Next

पोलीस बचावले : बॅरिकेटस तोडून पळाला आरोपी
तुमसर : तिरोडा गुमाधावडा येथील एक टिप्पर अज्ञात चोरटे तुमसरमार्गे पळवून नेत असल्याची माहिती भंडारा पोलिसांकडून तुमसर पोलिसांना मध्यरात्री मिळाली. तुमसर पोलिसांनी तातडीने खापा चौकात बॅरिकेटस लावून मार्ग बंद करीत होते. दरम्यान विरुध्द दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकचालकाने बॅरिकेट तोडून ट्रक सुसाट वेगाने पुढे गेला. त्यानंतर तुमसर पोलिसांनी या ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग करुन रामटेक मार्गावरील कांद्री शेतशिवारात पकडण्यात यश मिळविले. ही घटना मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली.
अशफाक युसुफ खान (३०) रा.कामगारनगर कामठी जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तिरोडा येथील अदानी पावरप्लँट गुमाधावडा गावाशेजारी रस्त्याच्या कडेला असलेला टिप्पर क्र. डब्ल्यू बी. ३७ बी.५००९ या ट्रकमध्ये कुणीही नसल्याचे पाहून आरोपीने टिप्पर पळवून नेला. याची माहिती होताच टिप्पर चालकाने तिरोडा पोलिसांशी संपर्क साधला. तिरोडा पोलिसांनी भंडारा कंट्रोल रुमला माहिती दिली. तिथून तुमसर पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान गस्तीवर असलेले तुमसरचे पोलीस हवालदार ओमकार श्रीवास, नितीन साकुरे, दिलीप धावडे, आक्रोज बडोले, चालक शरणागत यांनी ट्रक पकडण्यासाठी खापा चौरस्त्यावर बॅरिकेटस लावले. तितक्यात चोरी झालेला टिप्पर विरुध्द दिशेने येत असताना ओमकार श्रीवास यांना दिसताच थांबविण्याचे निर्देश दिले. परंतु आरोपीने बॅरिकेट तोडत रामटेकमार्गे पळ काढला. तुमसर पोलिसांनी वाहनाने पाठलाग करुन रामटेक मार्गावरील कांद्री शेतशिवारात पकडण्यात यश आले. त्यानंतर त्याला तुमसर पोलीस ठाण्यात आणून त्याची कोठडीत रवानगी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Following the Cinestyle, the theft tipper caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.