मुख्याधिकाऱ्यांची बदली रद्द करण्यासाठी अन्नत्याग सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:36 AM2021-04-16T04:36:04+5:302021-04-16T04:36:04+5:30
साकोली नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी एक वर्षापूर्वी माधुरी मडावी यांची नियुक्ती झाली. त्यांनी अनेक विकासात्मक कामे केलीत. कोरोना काळात त्यांनी ...
साकोली नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी एक वर्षापूर्वी माधुरी मडावी यांची नियुक्ती झाली. त्यांनी अनेक विकासात्मक कामे केलीत. कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शासनाने त्यांना उत्कृष्ट केले; परंतु त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्याकडील प्रभार साकोली तहसीलदारांकडे देण्यात आला. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मोठ्या प्रमाणात साकोली शहरात रुग्ण आढळून येत आहेत; परंतु नगर परिषदेला मुख्याधिकारी नाही. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी जागृत नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली. नगर परिषदेसमोर शिवकुमार गणवीर, उमेश कठाणे, कैलाश गेडाम, सुनंदा रामटेके, प्रभाकर सपाटे हे गुरुवारी एकदिवसीय अन्नत्याग सत्याग्रहाला बसले होते. या सत्याग्रहाला नगर परिषद उपाध्यक्ष जगन उईके, रवी परशुरामकर, पुरुषोत्तम कोटांगले, नालंदा टेंभुर्णे, राजश्री मुंगुलमारे, रोहिणी मुंगुलमारे, शयलू बोरकर, गीता बडोले, मीना लांजेवार, सुभाष बागडे यांच्यासह ११ नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.