बर्फ कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:44 AM2019-05-27T00:44:32+5:302019-05-27T00:45:00+5:30
शहरातील तकीया वॉर्ड परिसरात स्थित एमआयडीसीत एका बर्फ बनविणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली. यात मानकानुसार बर्फाची निर्मिती होत नसल्याची बाब लक्षात आली. अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती जप्त केलेला बर्फ नष्ट केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील तकीया वॉर्ड परिसरात स्थित एमआयडीसीत एका बर्फ बनविणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली. यात मानकानुसार बर्फाची निर्मिती होत नसल्याची बाब लक्षात आली. अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती जप्त केलेला बर्फ नष्ट केला.
एमआयडीसी येथील रतन कोल्ड स्टोरेजमध्ये नियमानुसार बर्फ तयार करण्याची पध्दत अंमलात येत नसल्याचे निदर्शनास आले. खाद्य बर्फ उत्पादकाना निळा रंग टाकण्याच्या सुचना अन्न व औषध प्रशानातर्फे देण्यात आली होती. त्यानुसार शहरातील बर्फ बनविणाºया उत्पादकांनी निळा रंग टाकण्याची सुरुवात केली होती. परंतु रतन कोल्ड स्टोरेज येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी धाड घातली असता त्यावेळी दोन प्रकारचे बर्फ तयार होत असल्याची बाब उघडकीला आली. शासनाच्या नियमानुसार निळा बर्फ तर कंपनीमालकाच्या निर्णयानुसार पांढरा बर्फ तयार करण्यात येत होता.
या संदर्भात कारखान्याचे मालक हरिभाई पटेल यांची चौकशी करण्यात आली. परंतु पटेल यांनी आपण खाद्य बर्फ बनवित नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. असे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी सांगितले.
बर्फाच्या लाद्यांची तपासणी करण्यात आली. त्यात अर्धे बर्फ निळे तर अर्धे बर्फ पांढरे होते. खाद्य बर्फाचा नमुणा प्रयोगशाळेसाठी घेवून उर्वरित बर्फाचा साठा जनआरोग्याच्या दृष्टीने नष्ट करण्यात आला. तसेच पाणी चाचणी अहवालही नव्हता. कारखाना परिसर अस्वच्छ असल्याचेही निदर्शनास आले. ही कारवाई नागपूर विभागाचे आयुक्त मी. श. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात सहा. आयुक्त ना. रा. सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी भाष्कर नंदनवार, पी.व्ही. मानवतकर यांनी केली.