अन्न व औषधी प्रशासनाने घेतली दुकानांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 09:45 PM2018-12-27T21:45:09+5:302018-12-27T21:45:26+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, जर्दा तंबाखू व अन्य पदार्थ उत्पादन, साठवणूक व विक्रीस बंदी असताना देखील लाखांदूर तालुक्यात राजरोस गुटखा व तंबाखू विक्री सुरू आहे. चौकाचौकात चहावाले, पान टपरीमध्ये खुलेआम गुटखा मिळतो. मात्र याकडे अन्न औषध विभाग व पोलीस प्रशासनाचा ढिम्मपणा कारणीभूत असल्याची बाबही उघडकीस आली. लाखांदुरातील काही व्यावसायीकांकडून मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा वाहतूक व विक्री जोमात चालू असल्याचे बुधवारला 'लोकमत'मध्ये प्रकाशीत करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, जर्दा तंबाखू व अन्य पदार्थ उत्पादन, साठवणूक व विक्रीस बंदी असताना देखील लाखांदूर तालुक्यात राजरोस गुटखा व तंबाखू विक्री सुरू आहे. चौकाचौकात चहावाले, पान टपरीमध्ये खुलेआम गुटखा मिळतो. मात्र याकडे अन्न औषध विभाग व पोलीस प्रशासनाचा ढिम्मपणा कारणीभूत असल्याची बाबही उघडकीस आली. लाखांदुरातील काही व्यावसायीकांकडून मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा वाहतूक व विक्री जोमात चालू असल्याचे बुधवारला 'लोकमत'मध्ये प्रकाशीत करण्यात आले होते.
प्रकाशीत झालेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा अन्न व औषध विभाग भंडाराच्या अधिकाऱ्यांनी लाखांदुरातील दुकानांची झडती घेतली आहे. 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशीत होताच सर्व व्यावसायिकांनी दुकान व गोडाऊन मध्ये लपवलेला तंबाखू व गुटखा लंपास करून दुसरीकडे हलवला असल्याने जिल्हा अन्न व औषध विभागाच्या हाती काहीच लागू शकले नाही.
लाखांदुरातील उपहारगृह व पान टपºयांवर मोठ्या प्रमाणात खर्रा व गुटखा विक्री होत असून हाटेल व पान टपरी व एका किराणा दुकान चालकाने दिलेल्या माहितीनुसार लाखांदुरातील व्यावसायिकांकडे तंबाखू व गुटख्याचा खुप मोठा साठा असल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान बुधवारला 'लोकमत' मध्ये वृत्त प्रकाशित होताच अन्न व औषध विभाग भंडाराचे अन्न सुरक्षा अधिकारी एस.एस. देशपांडे, पि.व्ही. मांडवटकर, सहाय्यक आयुक्त ना.रा. सरकटे, सहाय्यक एन.डी. बारसागडे यांनी लाखांदुरातील अमर किराणा, मोहन किराणा, एकता कन्फेक्शनरी, वसनशाह किराणा, माँ शक्ती ट्रेडर्स व अन्य पाच गोडाऊनची झडती घेतली आहे. यावेळी पोलीस हवालदार राजेश शेंडे, उदाराम ठाकरे सोबत होते. कारवाईची प्रक्रीया अशीच सुरळीत ठेवावी, असा सूर कारवाईदरम्यान बघ्योची होती.