बनावट दारु कारखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 10:53 PM2018-09-07T22:53:05+5:302018-09-07T22:54:01+5:30

नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारला धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी पाच जणांना याप्रकरणी अटक केली आहे.

The forage of a fake ammunition factory | बनावट दारु कारखान्यावर धाड

बनावट दारु कारखान्यावर धाड

Next
ठळक मुद्देपाच जणांना अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नामवंत मद्यनिर्मिती कंपन्यांची नक्कल करुन बनावट दारु निर्मिती कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारला धाड टाकली. यावेळी विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल आदी आढळून आले. पोलिसांनी पाच जणांना याप्रकरणी अटक केली आहे.
प्रशांत दुर्गाप्रसाद मानवटकर (२८), चेतन चकोले (२८), गोपाल ठाकूर (३२), गोलू गोस्वामी (२४) व कैलास मोहरकर (३०) सर्व रा. भंडारा असे बनावट दारु निर्मिती करणाऱ्यांची नावे आहेत.
सणांच्या निमित्ताने मौजा कारधा परिसरात अनेक दिवसांपासून बनावट दारुची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार गुरूवारला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चार चाकी वाहनांची झडती घेतली.
या दरम्यान सदर पाच इसम बनावट विदेशी मद्य तयार करून वाहतूक करताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून चारचाकी, दुचाकी, बनावट बाटल्या व दारूसाठी लागणारे साहित्य आढळून आले. याची किंमत तीन लाख ३० हजार रूपये असल्याचे सांगण्यात येते.
यावेळी विक्रीसाठी तयार केलेल्या मध्यप्रदेश राज्यात निर्मित व तेथेच विक्रीला असलेल्या सिल्व्हर झेड विस्की तसेच त्यापासून महाराष्टÑातील नामांकित ब्रॉण्डच्या विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, बनावट झाकण, लेबल असा तीन लाख २९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. त्याच्या विरुध्द महाराष्टÑ दारुबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त अश्विनी जोशी, संचालक सुनिल चव्हाण, उपायुक्त उषा शर्मा, भंडाराचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत निरीक्षक तानाजी कदम, दुय्यम निरीक्षक पांडूरंग घरटे, सुष्मा कुंभारे, रोहिनी बनकर, सहायक दुय्यम निरीक्षक अरविंद कोटांगले, नरेश उईनवार, जे.ए. अंबुले, संजय कोवे, हेमंत कांबळे, जयघोष जनबंधू, स्वप्नील लांबट, विनायक हरिणखेडे, नरेंद्र कांबळे, सविता गिरीपुंजे, मंगेश ढेंगे, विष्णू नागरे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात बनावट दारुचा शिरकाव
गावठी दारु पाठोपाठ आता जिल्ह्यात बनावट दारुनेही शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. नामवंत कंपन्यांच्या ब्रॅण्डची नक्कल करुन ही दारु विकली जाते. दिसायला हुबेहुब असल्याने अट्टल दारु पिणाºयांनाही ही बाब लक्षात येत नाही. परंतु या बनावट दारुमधील विषारी घटकांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही एक कारवाई केली असली तरी जिल्ह्यात असे अनेक कारखाने असण्याची शक्यता आहे.

Web Title: The forage of a fake ammunition factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.