लाखांदूर येथे विदेशी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 05:00 AM2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:11+5:30
लाखांदूर तालुक्यात टाकलेल्या छाप्यात एका बार मालकाला विदेशी दारूसाठा अवैधरित्या पुरवताना रंगेहात पकडले. यामध्ये बारमालकाकडून विदेशी दारूच्या १४ पेट्या, चार चाकी बोलेरो गाडी असा एकूण नऊ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने लाखांदूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. लाखांदूर शहरात देशी दारूविक्रते व बारची मोठी संख्या असून १४ हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत दारु विक्रेत्यांकडून विदेशी दारू किंमत नऊ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नाकेबंदी करून कुठेही अवैध प्रकार होणार नाही, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घातले.
लाखांदूर तालुक्यात टाकलेल्या छाप्यात एका बार मालकाला विदेशी दारूसाठा अवैधरित्या पुरवताना रंगेहात पकडले. यामध्ये बारमालकाकडून विदेशी दारूच्या १४ पेट्या, चार चाकी बोलेरो गाडी असा एकूण नऊ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने लाखांदूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
लाखांदूर शहरात देशी दारूविक्रते व बारची मोठी संख्या असून १४ हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होते. यावेळी अचानक टाकलेल्या धाडीमध्ये बारमालकाकडून विदेशी दारूसह अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लाखांदूर तालुक्याच्या सीमेलगतच दारुबंदी असलेले चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दारूचा अवैध साठा पुरवित असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच विभागाच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकून ही कारवाई केली.
गाडीचालक महेश दीपक कावळे (२३) रा. वडसा असे गुन्ह्यातील आरोपीचे नाव असून सदर दारू लाखांदूर येथील एका बारमधून घेवून वडसाकडे जात असल्याची माहिती चालकाने दिली. सदर चालकावर गुन्हा दाखल करुन त्याला न्यायालयात हजर केले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.
ही कारवाई अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक र.दा. पाटणी, दुय्यम निरीक्षक सुषमा कुंभरे, एस.डी. लांबट, न.सा. उमेनवर, जवान शिंदपुरे, नागदे यांनी कारवाई केली. अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना याबाबत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
ठेवली होती पाळत
नववर्षाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची मागणी असते. याचाच फायदा घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठिकठिकाणी भरारी पथके स्थापन करून कुठेही अवैधरित्या जिल्ह्यातून परजिल्ह्यात दारू वाहतूक होणार नाही यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली होती. सलग दोन दिवस पाळत ठेवून अखेर शनिवारी रात्री लाखांदूरातून वडसाकडे १४ पेट्या घेवून जात असलेल्या चार चाकी बोलेरे क्रमांक एमएच ३३ ए ३९६१ या गाडीसह विदेशी १४ दारूपेट्यांसह चालकाला पकडले.