उघड्यावर हागणदारीचे चित्र कायमच
By Admin | Published: December 27, 2014 10:46 PM2014-12-27T22:46:15+5:302014-12-27T22:46:15+5:30
ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी, लोकांनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी राज्य शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. या अनुदानात वेळावेळी वाढ
भंडारा : ग्रामीण भागातील उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी, लोकांनी शौचालय बांधून त्याचा वापर करावा यासाठी राज्य शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजना सुरू केली. या अनुदानात वेळावेळी वाढ केल्यामुळे गावात शौचालयाची संख्या वाढली आहे; परंतु या शौचालयाचा वापर नगण्य होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आजही ग्रामीण भागात २० टक्यापेक्षा जास्त कुटुंब उघड्यावरच शौच्छविधी करीत असल्याने उघड्यावरील हागणदारी कायम असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रात सन २००० पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात होते. ग्रामीण भागात सामूदायिक आणि वैद्यकीय स्वच्छतेतून ग्रामस्थांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. त्यानंतर केंद्र शासनाने संपूर्ण देशात निर्मलग्राम योजना सुरू केली.
शौचालय बांधणाऱ्या कुटुंबाला प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत होते. निर्मलग्राम अभियानाची व्याप्ती सन मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधकामासाठी शासनाकडून प्रोत्साहीत करण्यात आले. २०१२ मध्ये जिल्ह्यातील अनेक ग्रापंचायातींना निर्मलग्राम योजनेचा पुरस्कार मिळाला. तेव्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागात उघड्यावरील हागणदारी काही प्रमाणात कमी झाली होती.
सन २०१२-१३ या कालावधीत शौचालयाला मिळणाऱ्या अनुदानात वाढ झाल्यामुळे लोकांनी शासकीय अनुदान मिळते म्हणून मोठयÞा प्रमाणात शौचालय बांधली. परंतु ग्रामीण भागामध्ये या शौचालयाचा वापर पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. घरी शौचालय असताना देखील बहुतांश नागरिक उघड्यावरच शौचविधी करीत असल्यामुळे जिल्हा तसेच तालुक्याची परिस्थिती पाहिजे त्या प्रमाणात बदललेली नाही. (शहर प्रतिनिधी)