आपापसातील मदभेद विसरून पक्षवाढीच्या कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:34+5:302021-09-11T04:36:34+5:30

* प्रफुल पटेल * असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश *गभने सभागृह , तुमसर येथे कार्यकर्ता बैठकीत साधला संवाद ...

Forget the differences among yourselves and start working for party growth | आपापसातील मदभेद विसरून पक्षवाढीच्या कामाला लागा

आपापसातील मदभेद विसरून पक्षवाढीच्या कामाला लागा

Next

* प्रफुल पटेल

* असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

*गभने सभागृह , तुमसर येथे कार्यकर्ता बैठकीत साधला संवाद

१० लोक १४ के

तुमसर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकऱ्यांच्या मालाला उचित भाव मिळण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत, तसेच शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक करीत पेट्रोल व डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने उत्पादनाचा खर्च दुपटीने वाढलेला आहे. त्यामुळे या केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाईच्या विरोधात आवाज उठवून व आपापसातील मतभेद विसरून पक्ष वाढविण्याचे कार्य करावे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले

ते गभणे सभागृह, तुमसर येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.

यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजू कारेमोरे, धनंजय दलाल, माजी आमदार अनिल बावनकर, सरिता मदनकर, देवचंद ठाकरे, ठाकचंद मुंगूसमारे, धनेंद्र तुरकर, अभिषेक कारेमोरे, पमा ठाकूर, नेहा शेंडे, सरोज भुरे, निशिकांत पेठे, योगेश सिनगंजुडे, सलाम तुरक, खुशलता गजभिये, सुनील थोटे, राजेश देशमुख, यशीन छवारे, प्रदीप भरनेकर, संदेश डुभरे, प्रमोद इलमे, श्वेता कहालकर, के.के. पंचबुधे, जयश्री गभने, चंदा डोरले, सुमित डेकाटे, पुष्पलता गजभिये, आशा बन्सोड, पप्पू भइसरे, मुकेश मलेवार, टिंकू ठाकूर, बिसन ठवकर, बाळा समरीत, शेखर टिभुडे, शिशुपाल गौपाले, अवी पटले आदी उपस्थित होते.

खा. पटेल म्हणाले, आगामी नगर परिषद निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न करावेत. काही दिवसांपूर्वी जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीस स्वतः उपस्थित राहून भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतील सिंचनाच्या कामांच्या प्रगतीबाबत आढावा घेतला. सुरेवाडा उपसा सिंचन लिफ्ट एरिगेशनवर पम्प हाउस निर्माण करणे, गणेशपूर लिफ्ट एरिगेशन तयार करून बावनथडी प्रकल्पाचा उजव्या मुख्य कालव्याची वितरिका निर्माण करणे, चुलबंध मध्य प्रकल्प डावा कालवा, धारगाव उपसा सिंचन, चांदपूर जलाशयातील कॅनल दुरुस्ती करून सिंचन क्षमता वाढविणे यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मोहाडी तालुक्यातील आकाश पिकलमुंडे यांची प्रो- कबड्डी बंगाल वारियर्समध्ये निवड झाल्याबद्दल खासदार पटेल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यकर्ता बैठकीप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमसर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी सर्व प्रवेशितांचे पक्षाचा दुपट्टा वापरून स्वागत केले. प्रवेश घेणाऱ्यांत भूपेंद्र भुरे, मंगेश सिंधालोरे, सुदेश डुंभरे, घारपांडे, नावेद रजवी, संजयसिंह कुशवाह, मयूर मेश्राम, प्रशांत मलेवार, अमोल मेहर, विजय गभणे, दिगांबर लांजेवार, गणेश धुर्वे, अशोक रणदिवे, कुणाल तुळणकर, विवेक सातोणकर, अनिकेत गाढवे, करण जुहार, अभय बडवाईक, सिद्दीकी शेख, मनोहर साठवणे, संजय नगरे, मोहम्मद जिशान शेख, मोहशीन शेख, जुबेर शेख, मो. रेहान शेख, मुन्ना वर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

Web Title: Forget the differences among yourselves and start working for party growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.