मतभेद विसरून समाज एकीकरणात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:03 AM2021-03-13T05:03:35+5:302021-03-13T05:03:35+5:30

यावेळी रिपब्लिकन सेनाचे अचल मेश्राम, बुद्धिस्ट युथ फोर्सचे शशिकांत भोयर, भीमशक्ती संघटनेचे रोशन जांभुळकर, चंद्रशेखर टेंभुर्णे, दलित पँथरचे राहुल ...

Forget differences and participate in social integration | मतभेद विसरून समाज एकीकरणात सहभागी व्हा

मतभेद विसरून समाज एकीकरणात सहभागी व्हा

googlenewsNext

यावेळी रिपब्लिकन सेनाचे अचल मेश्राम, बुद्धिस्ट युथ फोर्सचे शशिकांत भोयर, भीमशक्ती संघटनेचे रोशन जांभुळकर, चंद्रशेखर टेंभुर्णे, दलित पँथरचे राहुल वानखेडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठवरे, बहुजन मुक्ती पार्टीचे अभिनव तिडके, राष्ट्रीय अमर कलानिकेतनचे अंबादास नागदेवे, लोक जनशक्ती पार्टीचे शिवदास गजभिये, धम्मपाल गजभिये, नाशिक चवरे, शशिकांत देशपांडे, मनोज खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आतापर्यंत आंबेडकरी संघटनांच्या सात बैठका झाल्यात. यात प्रामुख्याने, समाजातील विविध प्रश्नांवर व निवडणूक एकत्रित लढविण्याबाबत सर्वांनी समर्थन व संमती दर्शविली. समाजातील उपेक्षित व अन्यायग्रस्तांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी सर्व एकत्रित होऊन निवडणूक लढविणे, अन्यायाविरोधात लढा देणे यासह, आजही रमाई घरकुल आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन योजना, शिष्यवृत्ती समस्या, अनुसूचित जाती, जमातीचे रिक्तपदाचे बॅकलॉग व बेरोजगारी समस्या, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणे, कर्जपुरवठा योजनेतील अडवणूक, उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती, समाजातील उपेक्षित वर्ग आजही वंचित आहेत. भारतीय संविधानानुसार आमच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक तरतुदीनुसार सर्वांगीण विकासापासून सत्ताधाऱ्यांनी उपेक्षित ठेवलेला आहे. म्हणून, आंबेडकरवादी चळवळीतील विविध राजकीय पक्षांनी व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पक्ष संघटना विसर्जित न करता एकत्र होऊन पुढील होणाऱ्या निवडणुका व सामाजिक अन्याय अत्याचारांविरोधात लढा उभारण्यासाठी सर्वानुमते "संयुक्त लोकशाही आघाडी, भंडारा जिल्हाची स्थापना करण्यात आली. यावेळी आंबेडकरी संघटनेतील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Forget differences and participate in social integration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.