पक्षभेद विसरुन सरपंचांनी जनतेसाठी काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:13 AM2017-11-04T00:13:03+5:302017-11-04T00:13:24+5:30
मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे. हा मतभेद विसरुन निवडून आल्यानंतर सरपंचांनी जनतेच्या भल्यासाठी व गावाच्या विकासासाठी कामे करावे,....
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहदुरा : मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे. हा मतभेद विसरुन निवडून आल्यानंतर सरपंचांनी जनतेच्या भल्यासाठी व गावाच्या विकासासाठी कामे करावे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी मोहदुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित सरपंच तथा सदस्यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त केले.
यावेळी मंचावर मोहदुरा येथील नवनिर्वाचित सरपंच रामेश्वर लिचडे, गणेशपूरचे सरपंच मनिश गणविर, बेला येथील सरपंच बालु ठवकर, हत्तीडोईचे सरपंच जयदेव लांजेवार, जि.प. सदस्य सुभाष आजले, सदस्यगण मनोज वैरागडे, वामन बशेसंकर, सोमदास गभणे, राजु मेश्राम, हर्षीला वैरागडे, माजी सरपंच बिसन वैरागडे, विजय वैरागडे आदी उपस्थित होते. माजी सरपंच बिसन वैरागडे, विजय वैरागडे व मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
खा. पटोले यांनी अनेक मुद्यावर सरकारला घेरले. त्यामध्ये कर्जमाफीसाठी जी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. नोटबंदी, जीएसटी सारख्या मुद्यावर मत व्यक्त केले. शेतकºयांसाठी पीकविमा योजना ही शेतकºयांच्या फायदा करुन न घेता पीक विमा काढणारी कपंनीचाच पीक विम्यापासून फायदा होत असल्याचे सांगीतले. बहुजनामध्ये जो अंधार कायम आहे तो अंधार कशा दुर करता येईल. बहुजनाच्या हितासाठी शेतकरी बांधवाच्या भल्यासाठी सरकारसोबत भांडावे लागेल तरी चालेल असे मत ा व्यक्त केले.