माजी आमदार गोविंद शेंडे यांचे हृदयविकाराने निधन

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: October 19, 2023 04:41 PM2023-10-19T16:41:08+5:302023-10-19T17:02:57+5:30

दादा शेंडे बेटाळा शाळेचे विश्वस्त व अध्यक्ष होते. त्यामुळे ते नेहमीप्रमाणे आज दुपारी बारा वाजता दादा शेंडे १२.३० च्या दरम्यान बेटाळा येथील श्रीराम विद्यालयात गेले होते.

Former MLA Govind Shende passed away due to heart attack | माजी आमदार गोविंद शेंडे यांचे हृदयविकाराने निधन

माजी आमदार गोविंद शेंडे यांचे हृदयविकाराने निधन

भंडारा : माजी आमदार गोविंद  उपाख्य  दादा शेंडे यांचे आज  गुरुवारी दुपारी हृदयाच्या धक्क्याने निधन झाले. ते ८२ वर्षे वयाचे होते.

दादा शेंडे बेटाळा शाळेचे विश्वस्त व अध्यक्ष होते. त्यामुळे ते नेहमीप्रमाणे आज दुपारी बारा वाजता दादा शेंडे १२.३० च्या दरम्यान बेटाळा येथील श्रीराम विद्यालयात गेले होते. ते मुख्याध्यापकांच्या दालनात शाळेच्या विकासाविषयी चर्चा करत असताना अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे शाळेच्या नजीक असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ते शिपायासोबत  सोबत चालत डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी तात्काळ भंडारा येथे घेऊन जाण्याच्या सल्ला दिला. भंडाऱ्यातील एका खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांच्या मृत्यू झाल्याचे तेथील  डॉक्टरांनी घोषित केले. 

अल्पपरीचय

गोविंद उर्फ दादा शेंडे  यांचा जन्म आंधळगाव जवळील अकोला या लहान वस्तीत झाला होता. त्यांनी मानसशास्त्र या विषयात एम. ए. केले होते. त्यांना राजकारणाची आवड होती.  सर्वप्रथम त्यांनी  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात प्रवेश केला १९६७ ते १९७२ या काळात ते मोहाडी पंचायत समितीचे सभापती होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत भंडारा विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली. त्यांचे प्रतिस्पर्धी नाशिकराव तिरपुडे यांच्या पराभव करत ते निवडून आले होते.  

उत्तम वक्तृत्वामुळे राजकारणात छाप

दादा शेंडे हे उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. राज्याच्या राजकारणात विशेष छाप निर्माण केली होती. राष्ट्रवादीचे नेते व खासदार शरद पवार यांच्या जवळचे मानले जात होते. 

विविध राजकीय पदांवर काम

ते मोहाडी पंचायत समितीचे 1967 ते 1972 या काळात दुसरे सभापती राहिले.  १९७८ते १९९० पर्यंत सलग बारा वर्ष जिल्हा परिषद भंडाराचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या प्रशासनात चांगला दबदबा  होता.  त्यांच्यामागे  पत्नी, तीन मुले ,दोन मुली असा आप्त  परिवार आहे. उद्या शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर सकाळी नऊ वाजता अकोला येथील स्थानिक गावी अग्निसंस्कार केला जाणार आहे

Web Title: Former MLA Govind Shende passed away due to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू