भंडाराच्या बीटीबी भाजीमंडीत वैनगंगेच्या पुराचे चार फूट पाणी; व्यापाऱ्यासह तीन जिल्ह्यातील शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 12:20 PM2022-08-16T12:20:32+5:302022-08-16T12:20:54+5:30
१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीटीबीच्या दारापर्यंत पाणी येऊन ठेपले होते.
भंडारा :शनिवारपासूनच्या तीन दिवसाच्या झालेल्या जोरदात पावसाने वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडलेली असून शहरातील बीटीबी भाजीमंडीत पुताचे चार फूट पाणी शिरले आहे. व्यापाऱ्यांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असून वीस हजार शेतकऱ्यांची परवड होत आहे.
भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्याकरिता दररोज ताजा भाजीपाला पुरवठा करणारी बीटीबी सब्जी मंडी पुराच्या पाण्याने संकटात सापडलेली आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीटीबीच्या दारापर्यंत पाणी येऊन ठेपले होते. १६ ऑगस्टला पुराचे पाणी चार फुटापर्यंत वाढले. त्यामुळे बीटीबी असोसिएशनने बाजार बंद ठेवलेला आहे. सुमारे २० हजार शेतकऱ्यांची परवड झाली आहे.
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाने गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाणीस्तर कमी करण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. २०२० मध्ये बीटीबीत १५ ते२० फूट पाणी जमा झाले होते. त्यामुळे व्यापारी वर्गाचे आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे रुपयांचे नुकसान झाले होते.
बीटीबीत पुराचे चार फूट पाणी साचके असून आणखी पाणी वाढल्यास बीटीबीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तत्काळ उपायोजना करून पूरस्थिती नियंत्रणात करण्याकरिता तत्काळ पावले उचलावी.- बंडू बारापात्रे अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी भंडारा.