आगीत चार घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:28 AM2018-06-10T01:28:11+5:302018-06-10T01:28:11+5:30
सिहोरा गावात शनिवारच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास एका गोठ्याला आग लागली. त्यानंतर लोकांच्या ओरडण्याचा आवाज सुरू झाला आणि गावकरी जागे झाले. आणि पाहिले तर काय चार घरांना भीषण आगीने कवेत घेतले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा गावात शनिवारच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास एका गोठ्याला आग लागली. त्यानंतर लोकांच्या ओरडण्याचा आवाज सुरू झाला आणि गावकरी जागे झाले. आणि पाहिले तर काय चार घरांना भीषण आगीने कवेत घेतले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी आग विझविन्याचा प्रयत्न केला मात्र आग इतकी जास्त होती की या आगीत चारही घरे जळून खाक झाली.
अग्निशमन दलाला तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत लाखोचे सामान जळून राख झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध लागू शकलेला नाही.
सिहोरा येथील झेंडा चौक परिसरात दाट लोकवस्ती आहे. तिथे घरे एकमेकांना लागून आहेत. दरम्यान, मध्यरात्री एका गोठ्याला आग लागली. त्यामुळे आगीच्या ज्वाळा पसरत एका पाठोपाठ चार घरांना कवेत घेतले.
शनिवारला पहाटेच्या सुमारास घराला आग लागल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर संपूर्ण गाव जागा झाला. आति त्या घराच्या दिशेने धाव घेतली. यात राजू तुरकर, कुंजीलाल तुरकर, भोलाराम तुरकर आणि दशरथ बिसने यांचे घर आणि जनावराचे गोठे जळून खाक झाले. या आगीत तीन ते चार लाख रूपयांचे नुकसान झाले असून आग लागण्याचे कारण कळू शकले नाही.
आग विझविण्यासाठी अग्नीशमन विभागाला पाचारण करण्यात आले. या आगीत जीवनावश्यक वस्तू व जनावरांचा चारा, शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थळाला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, गटनेते अरविंद राऊत, सरपंच मधू अळमाचे आणि ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी भेट देऊन पाहणी करून नुकसानभरपाईची मागणी केली.