चार वर्षांत २३६ शेतकऱ्यांना मिळाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:29 AM2021-07-25T04:29:18+5:302021-07-25T04:29:18+5:30

भंडारा : शेतात काम करताना विविध अपघाताने शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. अशा शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे ...

In four years, 236 farmers got the benefit of Gopinath Munde Accident Insurance Scheme | चार वर्षांत २३६ शेतकऱ्यांना मिळाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

चार वर्षांत २३६ शेतकऱ्यांना मिळाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

Next

भंडारा : शेतात काम करताना विविध अपघाताने शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. अशा शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात येतो. भंडारा जिल्ह्यात गत चार वर्षांत जिल्ह्यातील २३६ शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. यासाठी गेल्या चार वर्षांत ३६१ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले होते.

घरातील कर्त्या व्यक्तीचा तसेच शेतकरी कुटुंबातील इतर सदस्य झालेला मृत्यू तसेच अपघातामध्ये कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन घरात हलाखीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबास अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांची भरपाई तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपयांची भरपाई, अपघातामध्ये एक डोळा, एक अवयव निकामी झाल्यास दोन लाखांची भरपाई तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये भरपाईचा लाभ देण्यात येतो. आर्थिक लाभ देण्याकरिता सर्व वहितीधारक खातेदार व शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य आई-वडील शेतकऱ्याची पत्नी, पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती असे १० ते ७५ वयोगटातील एकूण दोनजणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ हा कृषी विभागामार्फत दिला जातो. यासाठी जिल्ह्यातील एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.

बॉक्स

विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेले अपघात

रस्ता, रेल्वेचा अपघात, पाण्यात बुडून होणारे मृत्यू, अपघाती विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, उंचावरून पडून होणारा मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात होणारा मृत्यू, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या यासारख्या कारणांनी होणारे मृत्यू अथवा अपघात झाल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो.

बॉक्स

दाव्यासाठी लागणारी कागदपत्रे

तालुका कृषी अधिकारी पत्र, तारखेसहित संपूर्ण दावा अर्ज, वारसदारांच्या मोबाईल नंबरसहित भरलेला अर्ज, वारसदाराचे राष्ट्रीयीकृत बँकखाते, वयाचा दाखला, आधार कार्ड, पॅनकार्ड, जन्माचा दाखला, सात-बारा, सहा ड, मृत्यू प्रमाणपत्र, घटनास्थळाचा पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, अपंगत्वाचा दाखला, औषधोपचाराचे कागदपत्र, अपघात नोंदणी ४५ दिवसांच्या आत करावी, अशा कागदपत्रांचा समावेश यात आहे.

बॉक्स

वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसल्यास दाव्यासाठी लागणारी कागदपत्रे

ज्या शेतकऱ्यांची वहितीखातेधारक म्हणून नोंद आहे, त्यांचा वारस म्हणून प्रस्ताव सादर करतो आहे. त्या शेतकऱ्याच्या सात-बारा, उतारा, सहा ड, शासन निर्णयानुसार अपघातासंबंधी लागणारी सर्व कागदपत्रे, रेशनकार्ड, वहितीधारक खातेदार शेतकऱ्यांशी नाते स्पष्ट करणारे पुरावे असणे गरजेचे आहे.

कोट

कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते. आतापर्यंत भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या वारसदारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून घ्यावी.

हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा

चार्ट

मिळालेले एकूण लाभ एकूण अर्ज

2016 17 57 लाभ अपात्र 40

17 2017 72 लाभ अपात्र 57

2018 19 ५५ लाभ अपात्र 13

19 20 लाभ 84 अपात्र 27

Web Title: In four years, 236 farmers got the benefit of Gopinath Munde Accident Insurance Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.