चार वर्षात देश वेठीस गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:58 AM2018-05-18T00:58:15+5:302018-05-18T00:58:49+5:30
भंडारा जिल्ह्याची पोटनिवडणूक ही सरकारला नवी दिशा देणारी आहे. या सरकारने चार वर्षात केवळ विदेशवारी करून गोरगरीब जनता, शेतकरी, व्यवसायीक यांना वेठीस धरून या सर्वांना फोल आश्वासन देण्याव्यतिरिक्त काही केले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : भंडारा जिल्ह्याची पोटनिवडणूक ही सरकारला नवी दिशा देणारी आहे. या सरकारने चार वर्षात केवळ विदेशवारी करून गोरगरीब जनता, शेतकरी, व्यवसायीक यांना वेठीस धरून या सर्वांना फोल आश्वासन देण्याव्यतिरिक्त काही केले नाही. त्यामुळे जनतेसह शेतकरी हा हलवादिल झाला आहे. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेच्या हक्काची आहे. जनतेची फसवणूक करून सामान्यांची थट्टा मोडत आहे. अशा भुलथापा देणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मधुकर कुकडे यांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आंधळगाव येथे आयोजित प्रचार सभेत केले.
यावेळी किरण अतकरी, के.के. पंचबुद्धे, कलाम शेख, रमेश पारधी, राजुभाऊ कारेमारे, आनंदराव वंजारी, प्रमोद तितिरमारे, सिमा भुरे, सरपंच मोहिनी गोंडाणे, पुरूषोत्तम बुराडे, संजय मते, संजय टिकापाचे, रामरतन खोकले, राकेश कारेमोरे, बाबुराव मते, विनोद डोंगरे, रतिराम बुराडे, श्रीकांत येरपुडे, गजानन झंझाड, प्रभू मोहतूरे, विजय पारधी, निरंजन पारधी, अरुण तितिरमारे, श्याम कांबळे, आकाश बोंद्रे, उषा धार्मिक, सदाशिव ढेंगे, गणेश बांडेबुचे, सुनिल ठवकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार पटेल म्हणाले, शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. या सरकारने अजूनपर्यंत कर्जमाफी केली नाही, धानाला भाव दिले नाही. आता इंधनाची दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. जनतेला भूलथापा देण्याचे कार्य सरकारने केले आहे. संचालन प्रदीप बुराडे तर, आभार प्रदर्शन संजय मते, राकेश कोरमोरे यांनी केले.