चारचाकीची दुचाकीला धडक, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 09:36 PM2019-02-17T21:36:51+5:302019-02-17T21:37:41+5:30
फुलमोगराहून शहापूरकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनाला मागेहून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात तीनजण जखमी झाले. ही घटना रविवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास कवडशी फाट्याजवळ घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : फुलमोगराहून शहापूरकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनाला मागेहून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात तीनजण जखमी झाले. ही घटना रविवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास कवडशी फाट्याजवळ घडली.
जखमींना शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. रविवारला एमपीएससीची विविध केंद्रावर परिक्षा होती. परिक्षा देण्यासाठी धम्मदिप फागो मेश्राम (२६) हे दुचाकी क्रमाक एम एच ३६ एसी ९८२० ने शहापूरकडे जात होते. यावेळी त्यांच्यासोबत फुलमोगरा येथील त्यांचे नातेवाईक जुही घरडे सोबत होती.
यादरम्यान मागेहून येणाºया चारचाकी वाहन क्रमांक एम एच ३५ पी ६९५८ ने दुचाकीला धडक दिली. याचवेळी चारचाकी वाहनाने दुचाकीने दुध घेवून जाणाऱ्या शेतकऱ्याला धडक दिली. यात दोन्ही दुचाकींवरील तिघेजण जखमी झाले. घटनेनंतर चारचाकी वाहन चालक वाहन घेवून नागपूरकडे पसार झाला. तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिसांनी चारचाकी वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार मनोहर रामटेके करीत आहे.
महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: वळण असलेल्या व क्रॉसींग रस्त्यावर अपघाताची संख्या दिवसेंगणिक वाढत असल्याचे दिसून येते. वेगावर नियंत्रण नसल्यानेच घटना सातत्याने घडत असल्याचे जाणवते.