सर्वधर्मसमभावाचा सुगंध दरवळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:38 PM2018-03-30T22:38:44+5:302018-03-30T22:38:44+5:30
अड्याळ ग्रामवासी तथा परिसरातील ग्रामवासी मंगलमय दिवसाची वाट एखाद्या चातकाप्रमाणे पाहत असतात, तो क्षण म्हणजे जागृत हनुमंत देवस्थानमधील श्री हनुमंत जन्मोत्सव सोहळा होय.
विशाल रणदिवे ।
आॅनलाईन लोकमत
अड्याळ : अड्याळ ग्रामवासी तथा परिसरातील ग्रामवासी मंगलमय दिवसाची वाट एखाद्या चातकाप्रमाणे पाहत असतात, तो क्षण म्हणजे जागृत हनुमंत देवस्थानमधील श्री हनुमंत जन्मोत्सव सोहळा होय. घोडायात्रेच्या पर्वावर दर्शनासाठी विदर्भातील भक्तगण शनिवारी अड्याळ येथे गर्दी करणार आहेत. घोडायात्रेच्या यानिमित्ताने सर्वधर्म समभावनेचा सुगंध दरवळणार आहे.
अड्याळ येथील घोडा यात्रा विदर्भात प्रसिध्द आहे. अड्याळ ग्रामस्थांची एकता सर्वांच्या दु:ख-सुखात मदतीला धावुन जाणारे ग्रामस्थांचा या घोडायात्रेच्या निमित्ताने श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते.
त्यात अड्याळसह परिसरातील ८० गावांमध्ये एकता जोपासणारा सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम पार पडतो. ही परंपरा आजही अड्याळ येथे कायम आहे.
प्रसिध्द जागृत हनुमंत देवस्थानात पहाटे ५ वाजता हनुमंत जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यानिमित्ताने मागील दशकभरापासून सुंदरकांड पठणाची परंपराही कायम आहे.
छत्तीसगड राज्यातील कोरबा येथील विरेंद्र पांडे महाराज, हभप तिरथ बाराहाते (उज्जेन), किशोर देवईकर व भाविक भक्तगण मंडळीच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा होणार असल्याची माहिती हनुमंत देवस्थान समिती अध्यक्ष भाष्करराव पोटवार यांनी दिली. या जन्मोत्सवानिमित्ताने या दिवसाला अड्याळमधील गल्लीबोळीतही रामनामाची धून ऐकावयास मिळते. भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच गर्दी नियंत्रणासाठी गावातील स्वयंसेवक तसेच पोलीस यंत्रणाही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेली आहे.
सोहळ्याच्या मदतीसाठी अड्याळ ग्रामवासी जात, धर्म, पंथ बाजुला सारुण एकत्र येतात. त्यामुळे ईथे राष्टÑीय एकात्मतेचे दर्शन घडून येते.
या सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्यात पहिल्या वर्षी दोन विवाह पार पडले होते. याचे अनुकरण आता परिसरातील गावागावांत पहायला मिळत आहे. ही अंत्यत समाधानाची बाब ग्रामविकास एकात्मता भागवत समिती अड्याळला असल्याची माहिती भैय्यासाहेब क्षीरसागर यांनी दिली.
अड्याळ मधील घोडायात्रा पाहायला, हनुमान जन्मोत्सव सामूहिक विवाह सोहळा तसेच महाप्रसाद वितरणादरम्यान हजारोंच्या संख्येने भाविक भक्त मंडळी येणार असल्याचे माहिती भागवत समितीचे कार्यकारी अध्यक्ष रामकृष्ण कुर्झेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
अनेकवर्षापासुन या पर्वावर नाथजोगी समाजबांधव मोठ्या संख्येने शेकडो वर्षापासून या जागृत हनुमान मंदिरात या दिवसाला दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारे तिर्थस्थळ म्हणून अड्याळची ओळख बनली आहे.
विविध कार्यक्रम
कोंढा कोसरा: कोंढा येथे हनुमान जंयतीनिमित्त हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोंढा येथील सार्वजनिक हनुमान देवस्थान येथे जागृती, गोपालकाल्याचे आयोजन केला आहे. मेनरोड, कोंढा येथील मंदिरात जागृती, प्रवचन व सर्व भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. चुºहाड (कोसरा) येथील मंदिरात जागृती, प्रवचन व महाप्रसाद यांचे आयोजन केले आहे.