चंदनाच्या सुगंधातून मैत्रीचा सुंगध दरवळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:01 AM2018-04-06T01:01:08+5:302018-04-06T01:01:08+5:30
भारतातून २५ टन चंदनाची लाकडे भारत सरकारच्या विशेष परवानगीने जपानमध्ये नेण्यात आली. या लाकडापासून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती जपानच्या बौद्ध विहारात तयार करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : भारतातून २५ टन चंदनाची लाकडे भारत सरकारच्या विशेष परवानगीने जपानमध्ये नेण्यात आली. या लाकडापासून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती जपानच्या बौद्ध विहारात तयार करण्यात आली. त्यामुळे या बुद्ध मूर्तीमधून भारत-जपान देशाच्या मैत्रीचा चंदनरुपी सुगंध दरवळत आहे, असे प्रतिपादन जपानचे भदंत ओकामुरा हेंडो यांनी केले.
जपानच्या ओमिदाचिंमा शेगा या बौध्द केंद्राच्या कानोंशोजी बौध्द विहाराचे विहाराधिपती भदंत ओकामुरा हेंडो व पन्ना मेत्ता संघाचे अध्यक्ष संघरत्न मानके यांच्यामध्ये दोन्ही विहारांमध्ये धार्मिक आदान प्रदान करण्याचा व सलोख्याचे संबंध ठेवण्याचा ऐतिहासीक करार महासमाधीभूमी महास्तुप, रुयाळ येथे झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भंदत संघरत्न मानके होते.याप्रंसगी महास्तुपात जपानी व भारतीय बौध्द पध्दतीने पुजापाठ करण्यात आली. याप्रसंगी भदंत संघरत्न मानके यांनी करारामुळे दोन्ही बौध्द विहारादरम्यानचे सांस्कृतिक, धार्मिक संबंध वाढून येथील महास्तुपाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व वाढेल. या कराराचे साक्षीदार म्हणून अॅड. महेंद्र गोस्वामी हजर होते.
यापं्रसगी जपानचे नोया योशीयाकी, जोनीशी योशीहीरो, ताकाशी तोशीको, तानाका काझ्युयाश्यु, सुवा केजीरो, योनेडा मुतसुको, योनेडा युकीको, लोमेश सुर्यवंशी, मोहन पंचभाई, अॅड. जयराज नाईक, मनोहर मेश्राम ब्रम्ही, अरवींद धारगावे, मंगला निखाडे, लक्ष्मीकांत तागडे, आनंद विलास रामटेके, शिलमंजु सिंहगडे, भारतभुषण वासनीक, अंबादास लोणारे, भदंत धम्मतय, तोमेश्वर पंचभाई यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक उपासीका उपस्थित होते.