कोरोना योद्धांना मोफत डिझेल पेट्रोल वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:35 AM2021-05-23T04:35:05+5:302021-05-23T04:35:05+5:30
जिल्ह्यातील सरकारी व खासगी तसेच ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या गाड्यांना रुग्णांना वाहून नेण्याकरिता व त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा नियमित करण्यासाठी ...
जिल्ह्यातील सरकारी व खासगी तसेच ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या गाड्यांना रुग्णांना वाहून नेण्याकरिता व त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा नियमित करण्यासाठी वारंवार ये-जा करीत असतात. त्यामुळे विपुल प्रमाणात इंधनाची गरज भासते. आर्थिक नुकसान सोसावा लागतो. त्या अनुषंगाने रिलायन्स ग्रुप तर्फे मोफत इंधन देऊन या योजनेचा शुभारंभ रिलायन्स पेट्रोल पंप मुजबी येथे करण्यात आले. यात १०८ , १०२ व खासगी ॲम्ब्युलन्सला मोफत डिझेल, पेट्रोल देण्यात आले.
सदर मोफत पेट्रोल, डिझेल वितरणाचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे , आमदार डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निखिल डोकरीमारे, उपविभागीय अधिकारी साहेबराव राठोड, तहसीलदार संजय पोयाम, डॉ. गोपाल व्यास, डॉ. रुपेश दुरुगकर, चंद्रप्रकाश दुरुगकर, अरविंद भालाधरे, भाजप तालुकाध्यक्ष विनोद बांते, संजय कुंभलकर, तिलक वैद्य, डॉ. रेखा रामटेके, विनोद गनगने, अभिजित दुरुगकर, नरेश सेलोकर, रोशन ठवकर, रवी दिवटे, शुभम चौधरी, दिनेश भिवगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाला विशेषतः संपूर्ण जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारे जगदंबा ऑक्सिजन प्लांटचे संचालक मित्तल, मॅनेजर अमिता वासनिक यांचे रोप देऊन सत्कार करण्यात आले. सदर मोफत योजना ३० जूनपर्यंत चालणार आहे. प्रास्ताविक चंद्रप्रकाश दुरुगकर यांनी केले. आभार डॉ. रुपेश चंद्रप्रकाश दुरुगकर यांनी मानले.