कृषी सिंचन योजनेतून सिंचन संचाची मोफत दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:00 AM2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:00:55+5:30

केंद्र व राज्य शासनाने ठिंबक सिंचन योजना राबविण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच उत्पादक व संबंधित कंपनीचे पुरवठादार विक्री करीत असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात विक्रीपश्चात सेवा शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र उघडून देणे आवश्यक आहे. पुरवठा केलेल्या संचासाठी संबंधित शेतकऱ्याला तीन वर्षापर्यंत मोफत सर्व्हिसिंग सेवा देणे आवश्यक आहे.

Free repair of irrigation system from Krishi Sinchan Yojana | कृषी सिंचन योजनेतून सिंचन संचाची मोफत दुरुस्ती

कृषी सिंचन योजनेतून सिंचन संचाची मोफत दुरुस्ती

Next
ठळक मुद्देप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : २० ऑगस्ट रोजी मोहिमेचा होणार समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन २०२०-२१ अंतर्गत कृषी विभागाच्या निर्देशानुसार संबंधित कंपनी व वितरकांकडून सूक्ष्म सिंचन संच दुरुस्ती करण्याची मोहीम ६ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा समारोप होणार २० ऑगस्ट रोजी होणार आहे. शेतकऱ्यांनी या मोहिमेअंतर्गत सिंचन संचाच्या दुरुस्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे.
केंद्र व राज्य शासनाने ठिंबक सिंचन योजना राबविण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याअंतर्गत सूक्ष्म सिंचन संच उत्पादक व संबंधित कंपनीचे पुरवठादार विक्री करीत असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात विक्रीपश्चात सेवा शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र उघडून देणे आवश्यक आहे. पुरवठा केलेल्या संचासाठी संबंधित शेतकऱ्याला तीन वर्षापर्यंत मोफत सर्व्हिसिंग सेवा देणे आवश्यक आहे. पुरवठा केलेल्या संचामध्ये मोडतोड झाली असल्यास बदलावयाच्या साहित्याची किंमत आकारून तो पार्ट बदलून देणे आवश्यक आहे. सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कंपनीला ही सेवा देणे बंधनकारक केले आहे. या पंधरवड्यात शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन सेवा उपलब्ध करून देण्याबरोबर सूक्ष्म सिंचनासह तांत्रिक माहिती देणे व त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. कौशल्याधारित कामे करणाºया शेतमजुरांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

सध्या शेतीचा खरीप हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांना उधारीवर खते किंवा विविध कामे करावी लागतात. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती बेताची असल्याने शेतकऱ्यांना सिंचन संचाची दुरुस्ती करण्यास अडचणी येतात. अनेकदा सिंचन संच स्वत:जवळ असतानाही शेतीसाठी उपयोग करता येत नसल्याने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत संचाची दुरुस्ती शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे.
-अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी,भंडारा

Web Title: Free repair of irrigation system from Krishi Sinchan Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.