महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:14 PM2017-09-24T23:14:00+5:302017-09-24T23:14:25+5:30

नवदुर्गा उत्सव मंडळ सब्जी मंडी व डॉ. शुभम मनगटे आणि स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Free treatment for thousands of patients in the Medical Camp | महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर मोफत उपचार

महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर मोफत उपचार

Next
ठळक मुद्दे३० डॉक्टरांची चमू : मान्यवरांनी दिला उपस्थितांना आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नवदुर्गा उत्सव मंडळ सब्जी मंडी व डॉ. शुभम मनगटे आणि स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात, शहरातील व ग्रामीण भागातील हजारो रूग्णांनी आरोग्याची तपासणीसह उपचाराचा लाभ घेतला.
संत गाडगेबाबा सांस्कृतिक नवदुर्गा उत्सव मंडळ सब्जी मंडी व स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयातील डॉ. शुभम मनगटे यांच्या पुढाकाराने तुमसर येथील रायबहादूर प्राथमिक विद्यालय येथे महाआरोग्य शिबिराचे रविवारला आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, विजयकुमार डेकाटे, कल्याणी भुरे, सभापती मेहताबसिंग ठाकुर, सुनिल पारधी उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागपूर दंत महाविद्यालयातील ३० डॉक्टरांची चमू ज्यामध्ये काळमेघ महाविद्यालयातील सीईओ डॉ. शिवकुमार घोडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. विजय गेडाम, जनरल फिजीशियन डॉ. पवार, डॉ.अक्षय मिश्रा व अन्य डॉक्टरच्या चमूने रुग्णांची तपासणी करून मोफत औषधांचेही वाटप केले.
यावेळी बालरूग्ण, दंत तपासणी, डोळ्याची तपासणी, रक्त तपासणी करण्यात येऊन उपचारही करण्यात आले. तर ९० नेत्र रूग्णांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या स्व.काळमेघ महाविद्यालयात बोलाविण्यात आले. त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात येईल असे आयोजक डॉ.शुभम मनगटे यांनी सांगितले. यामध्ये विशेष उपचार, दंतरोग्याचे करण्यात आले. अनेक रूग्णांचे दात साफ करण्यात आले तर अनेकांचे दात फिलींग करून देण्यात आले.
काहींचे दात काढण्यात आले. यासाठी विशेष महाविद्यालयाची फिरते तपासणी वाहन (डेंटल चेकअप वाहन) आणण्यात आले होते. सकाळी ११ ते ६ पर्यंत मोठ्या प्रमाणात रूग्णांची तपासणी, रक्त तपासणी डोळे, दंत, हार्ट, जनरल सर्व तपासण्या व उपचार नि:शुल्क व औषधही दिले.
या शिबिरासाठी डॉ.शुभम मनगटे यांचे वडील नामदेव मनगटे, विजय हटवार, दिलीप गभणे, अशोक आडझा, शैलेश नासरे, निलेश नासरे, सुरेश माधवानी, सुनिल पारधी, विष्णू आडझा, अ‍ॅड.दिपक रावलानी, सुनिल कामळे, सुनिल जिभकाटे, देवेंद्र तलमले, शरद पडोळे, रितेश पडोळे, गणेश वंजारी, शिव माधवानी यांनी प्रयत्न केले. या शिबिरातून तुमसर व परिसरातील नागरिकांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी औषधोपचार करून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली.
या महाआरोग्य शिबिरासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावून आरोग्य तपासणी केली. मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश दिला.

Web Title: Free treatment for thousands of patients in the Medical Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.