स्वातंत्र्य संग्राम सैनिक शेंडे यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:30 AM2018-02-09T00:30:27+5:302018-02-09T00:31:03+5:30
ऑनलाईन लोकमत
भंडारा : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भूमीगत राहून मोलाची भूमीका वठविणाऱ्या एका ८७ वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाने निवृत्ती मानधनाकरिता ३ फेब्रुवारीपासून करडी येथील मानव प्रेमाश्रम आश्रमात उपोषण सुरू केले होते. दरम्यान आमदार चरण वाघमारे यांनी उपोषणस्थळी जाऊन शेंडे यांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याची हमी दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
श्यामसुंदर शेंडे यांचा मानधनाच्या मानधनासाठी मागील ३३ वर्षांपासून अविरत लढा सुरू आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यासह खासदार, आमदारांना अनेकदा मागणी पूर्ण न झाल्याने शेवटी त्यांनी आमरण उपोषण करण्याचा प्रण केला. शेंडे विश्वमानव संत दरबार प्रेमाश्रम करडी येथे उपोषण करणार आहे.
या संदर्भात मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविला होता. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही श्यामसुंंदर शेंडे यांनी केली होती. सन १९९३ मध्ये मानधन वाढीसाठी ९९ दिवसांचे व त्यानंतर १७ दिवसांचे उपोषण केले होते. त्यावेळीही शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले होेते. मात्र कारवाई झाली नव्हती. यावेळी मात्र उपोषणस्थळी स्वत: आमदार चरण वाघमारे यांनी भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत तहसिलदार सुर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक, सरपंच महेंद्र शेंडे आदी उपस्थित होते. यावेळी शासनाद्वारे श्यामसुंदर शेंडे यांचे निवृत्तीवेतन मंजुर करण्याचे आश्वासन आ. वाघमारे यांनी दिल्यानंतर त्यांना लिंबूपाणी पाजून उपोषण मागे घेतले. तसेच आ.चरण वाघमारे यांनी स्वत:कडून दरमहा एक हजार रूपयांची मदत देण्याची घोषणाही यावेळी केली. श्यामसुंदर शेंडे हे स्वातंत्र्य संग्राम सैनिक असूनही त्यांच्यावर आतापर्यंत अन्यायच होत आहे.