आंबेडकरी संघटनांची शुक्रवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:44+5:302021-03-04T05:07:44+5:30
जिल्ह्यातील समविचारी विविध आंबेडकरी संघटनांच्या बैठका मागील अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक ज्वलंत प्रश्नावर आयोजित करण्यात आल्या. यामध्ये आंबेडकरी समाजावर ...
जिल्ह्यातील समविचारी विविध आंबेडकरी संघटनांच्या बैठका मागील अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक ज्वलंत प्रश्नावर आयोजित करण्यात आल्या. यामध्ये आंबेडकरी समाजावर होणारे अन्याय अत्याचार, रमाई आवास योजना, निराधार, बेरोजगार यांच्या प्रश्नावर चर्चा व अनुसूचित जाती, जमाती नोकर भरतीबाबत व सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असलेल्या अनेक योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत मिळण्याबाबत व अनेक समाजातील ज्वलंत विषयावर चर्चेकरिता व न्याय्य हक्कासाठी संयुक्तरीत्या लढा उभारण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये सम्राट अशोक सेना, बसपा, वंचित बहुजन आघाडी, दलित पँथर, रिपब्लिकन सेना अणि रिपब्लिकन पक्षाचे विविध घटक पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, सामाजिक न्याय संघटना, समता सैनिक दल, बुद्धिस्ट युथ फोर्स, लोजपा, दलित सेना, भारतीय बौद्ध महासभा, बहुजन मुक्ती मोर्चा, भीमशक्ती संघटना, केंद्रीय मानवाधिकार संघटन, भीम आर्मी आदी समविचारी आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सदर बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन अचल मेश्राम, तुळशीराम गेडाम, शशिकांत भोयर, रोशन जांभूळकर, रेखा टेंभूर्णे यांनी केले आहे.