अंगणवाडी कर्मचाºयांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 10:34 PM2017-10-01T22:34:55+5:302017-10-01T22:35:07+5:30
तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी विविध मागण्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी विविध मागण्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
आयटक महाराष्टÑ राज्य अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी युनियनद्वारे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष सविता लुटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्याबाबत जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकाºयासोबत चर्चा करण्यात येणार होती. पण त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात दोन वर्षापूर्वी मृत्यू पावलेल्या, राजीनामा दिलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना शासन निर्णयाप्रमाणे सेवानिवृत्त लाभ देण्यात आलेला नाही. अंगणवाडी कर्मचाºयांचा थकीत प्रवासभत्ता, जनश्री विमा योजनेची अंमलबजावणी करुन अंगणवाडी कर्मचाºयांना मिळणारा लाभ देण्यात यावे, जनश्री विमा योजनेला लाभ शासन निर्णयाप्रमाणे छाया रविंद्र कामथे मदतनीस यांना देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाºयाचे माहे जून पासूनचे थकीत मानधन त्वरित दयावे, प्रवास भत्ता, पालांदूर बिट २०१० आॅक्टोंबर ते डिसेंबर व जानेवारी ते डिसेंबर २०११ चे देण्यात यावे, आहाराचे थकीत बील द्यावे, अंगणवाडी इमारत भाडे द्यावे आदी मागण्यांचे निवेदन खंडविकास अधिकारी बडगे यांना देण्यात आले. याप्रसंगी शिवकुमार गणवीर, हिवराज उके, लिलावती बडोले, आशा रंगारी, मोहिनी लांजेवार, कमल कमाने, शालिनी तुमसरे, सीमा खांडेलकर, बबीता मेश्राम, देवांगणा शेंडे, ललिता खंडाईत, मंदा गोमासे, शितल जंवजार, अर्चना खरवडे, मिरा चकोले, रेखा पडोळे, आशा बोळणकर, उषा ब्राम्हणकर उपस्थित होते.