संतप्त भाजीपाला विक्रेत्यांचा नगरपालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:34 PM2018-03-13T23:34:58+5:302018-03-13T23:34:58+5:30

येथील आठवडी बाजारात भाजी विक्रेते व किरकोळ वस्तू विक्रेते यांना जागा होत नाही.

In front of municipal council of angry vegetable vendors | संतप्त भाजीपाला विक्रेत्यांचा नगरपालिकेवर मोर्चा

संतप्त भाजीपाला विक्रेत्यांचा नगरपालिकेवर मोर्चा

Next
ठळक मुद्देपालिका प्रशासनाचा विरोध : आजपासून बाजारबंदचा इशारा

आॅनलाईन लोकमत
पवनी : येथील आठवडी बाजारात भाजी विक्रेते व किरकोळ वस्तू विक्रेते यांना जागा होत नाही. रस्त्याच्या कडेला बसले तर वाहतूक खोळंबलेली असते. रस्त्याच्या कडेला कोणत्याही परिस्थितीत भाजी विक्रेते बसणार नाही असा मुख्याधिकारी यांचा अलिखीत आदेश आहे. व्यवसाय बुडत असल्याने बाजारात नियमित बसणारे भाजी व किरकोळ वस्तू विक्रेते एकत्र आले आणि नगरपरिषदेकडे मोर्चा वळविला. एक ते दीड तास वाट पाहून मुख्याधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी खाली आल्या नाहीत त्यामुळे निराश होवून व्यापारी परतले. तसेच मंगळवारपासून बाजार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
मोर्चाचे नेतृत्व डॉ.राजेश नंदूरकर यांनी केले. यावेळी राजू गणवीर, प्रफुल्ल सावरकर, क्रिष्णा खांदाडे, भूषण सावरकर, धनराज उपरीकर, सुमन नंदूरकर, छबूताई डोंगरे, विठाबाई बावनकर, हरिहर खापरीकर व शेकडो भाजीपाला विक्रेते व किरकोळ वस्तू विक्रेते उपस्थित होते.
भाजीविक्रेत्यांचा मुख्याधिकाऱ्यांना दम
बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्यासाठी आलेल्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना ‘माझा दुकान उध्वस्त केला तर खबरदार’ असा दम एका भाजीपाला विक्रेत्या महिलेने भरला. शनिवार व मंगळवार असे दोन दिवस भरणाऱ्या बाजारातील विक्रेत्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणाºया मुख्याधिकारी यांनी बाजारातील जागेचा नियोजन केले नाही. रस्त्यावर भरणारा बाजार अधिकृत ठिकाणी भरविण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्यास भाजीपाला घरी घेऊन जावे लागते.

Web Title: In front of municipal council of angry vegetable vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.