शिवसेनेचा लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: July 1, 2017 12:27 AM2017-07-01T00:27:33+5:302017-07-01T00:27:33+5:30
शिवसेनेनी लाखांदूर तहसील कार्यालयावर जनतेचे अनेक प्रश्न घेऊन मोर्चा शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले व उपजिल्हा प्रमुख वसंत येंचीलवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.
अनेक समस्यांवर चर्चा : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शिवसेनेनी लाखांदूर तहसील कार्यालयावर जनतेचे अनेक प्रश्न घेऊन मोर्चा शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले व उपजिल्हा प्रमुख वसंत येंचीलवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी, जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदन मधील मागण्यांप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीमध्ये अस्पष्टता व दोष दूर करून त्वरित अंबलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या कृषी मालाला माफक दर मिळण्याकरिता स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, सन २०११ मध्ये सर्वेक्षण होऊनही द्रारिद्य रेषेखालील यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही ती त्वरित प्रसिद्ध करण्यात यावी, कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर येथील जुने संचालक मंडळ व प्रशासकाच्या कार्यकाळातील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्यांची चौकशी करून फौजदारी कारवाई करावी, लाखांदूर तालुक्यात एका गटसचिवाने शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी विशेष अंकेक्षण करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात द्यावा, वन हक्क कायद्या अंतर्गत प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, प्रतीक्षा यादी रद्द केल्यामुळे व नवीन यादी थोपल्यामुळे अनेक गरजू लाभार्थ्यांना घरकूल मिळण्यात झालेल्या अडचणी दूर कराव्या, आदी मागण्यांचा समावेश आहे.
मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष महाले यांना निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख वसंत येंचीलवार, विजय काटेखाये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, तालुका प्रमुख अरविंद बनकर, राजू ब्राम्हणकर, किशोर चन्ने, दिनेश पांडे, तुमसर, महेश पटले, बंडूभाऊ लिचडे, नरेश करंजेकर, मनोहर जांगळे, परसराम बावनकर, भोजराज वैद्य, दिलीप सिंगाडे, रतन झिंगरे, विनायक सरोते, रुपेश साठवणे, रंजुताई निमजे, विमलताई तांडेकर, आदित्य नकाते, सतीश मिषार, अरविंद हटवार, विनोद साठवणे, वैभव चोपकर, सुभाष रोकडे, सचिन ठाकरे, निकेश राउत, भूषण भुते सह आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.