फळांच्या दरामध्ये ३० टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:48+5:302021-05-01T04:33:48+5:30
कोरोनामुळे नागरिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधाेपचारापेक्षा फळांचा आहार महत्त्वाचा आहे. यामध्ये लिंबू, संत्रा, मोसंबी, किवी, नारळपाणी, टरबूज, खरबूज यांसह ...
कोरोनामुळे नागरिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधाेपचारापेक्षा फळांचा आहार महत्त्वाचा आहे. यामध्ये लिंबू, संत्रा, मोसंबी, किवी, नारळपाणी, टरबूज, खरबूज यांसह आंबा ही फळे बाजारात उपलब्ध आहेत. याचा दररोजच्या आहारात उपयोग केला तर रोग प्रतिकारशक्ती कायम वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. याबाबतचे सूत्र डाॅक्टरांना कधीचेच समजले आहे. यामुळे डाॅक्टर मंडळी फळे आणि व्यायामांवर अधिक लक्ष केंद्रीत करतात. सर्वसामान्य नागरिक त्यापेक्षा चमचमीत पदार्थांवर आणि मसालेदार पदार्थांवर खर्च करतात. यातून रोगालाच निमंत्रण दिले जाते. तेलकट पदार्थांनी चरबी आणि बीपीसारखे आजारही वाढतात. आहार हा खनिज पुरवणारा मुख्य स्रोत आहे. तो थेट शरीराला फळाच्या रूपात उपलब्ध होतो. प्रत्येक सिझनमध्ये विविध फळे बाजारात येतात. त्याचा आपण वापर केला पाहिजे. आता कोरोना काळात फळांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. यातून मागणी जास्त, पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे फळांच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.