साकोली आगारात इंधन बचत, सुरक्षितता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:41 AM2021-02-17T04:41:45+5:302021-02-17T04:41:45+5:30

साकोली : साकोली आगारामध्ये इंधन बचत मासिक समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून साकोली आगार व्यवस्थापक ...

Fuel saving, safety campaign at Sakoli depot | साकोली आगारात इंधन बचत, सुरक्षितता मोहीम

साकोली आगारात इंधन बचत, सुरक्षितता मोहीम

Next

साकोली : साकोली आगारामध्ये इंधन बचत मासिक समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून साकोली आगार व्यवस्थापक गौतम शेंडे, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्राचार्य घनश्याम निखाडे वैनगंगा तंत्रनिकेतन साकोली व प्रमुख अतिथी म्हणून कुमारी साखरवाडे स.वाह. अधीक्षक रा. प. साकोली अतिथी म्हणून श्री. शेडमाके रा. प. साकोली त्याचप्रमाणे चालक, वाहक, यांत्रिके, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करतानी प्राचार्य निखाडे यांनी इंधनाचा कमीत कमी कसा वापर करता येईल व इंधनाची बचत कसे करता येईल या विषयावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले त्यामध्ये एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवावे , टायर प्रेशर नेहमी तपासणी करावी, उन्हाळ्यामध्ये आवश्यकता असल्यास एसीचा वापर करावे, स्पार्क प्लग्स नेहमी स्वच्छ करावे, गिअर बदलविण्यासाठी क्लच पॅडलचा वापर करा त्यावर स्वार होऊ नका, ब्रेकचा कमी वापरासाठी वेग नियंत्रित ठेवावे त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला गाडी सुरू ठेवून कोणाशी बोलणे टाळावे, कच्च्या तेलाचे साठे दिवसेंदिवस कमी होत आहेत त्याचे कारण म्हणजे वाढती उष्णता त्यासाठी सर्व नागरिकांनी जागरूक राहून आवश्यकता असेल तिथेच गाडीचा वापर करावे अन्यथा सायकलवर स्वारी काढायला दिवस लागणार नाही.

त्यासाठी इंधन बचत काळाची गरज आहे असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले. त्याचबरोबर आगार व्यवस्थापक श्री शेंडे यांनी चालक, तसेच वाहकांना थांबा नसेल तिथे गाडी थांबवू नये, आपल्या गाडीची सुरक्षितता पाहून शख्य असल्यास गाडी थांबावे आपण आपल्याबरोबर ५० लोकांचा परिवार सोबत घेऊन जात असतो त्यासाठी गाडीवरून आपला संतुलन जाणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर इंधन बचतमध्ये महाराष्ट्रातून तसेच भंडारा जिल्ह्यातून प्रथम मानांकन साकोली आगाराला मिळाला त्याच्या सर्व श्रेय त्यांनी आपल्या आगारातील कर्मचारी यांना दिले. त्याचबरोबर सत्र २०२०-२१ मध्ये पुन्हा प्रथम क्रमांक अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवर्जून सांगितले. इंधन बचत कार्यक्रमाची सांगता त्यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये जवळपास ५० कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Fuel saving, safety campaign at Sakoli depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.