जलशुद्धीकरण केंद्रासाठी निधी मंजूर

By admin | Published: August 21, 2016 12:28 AM2016-08-21T00:28:23+5:302016-08-21T00:28:23+5:30

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सोनी आणि चप्राड य्रेथे प्रत्येकी ५० लाख रुपये खर्चाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे.

Fund sanction for water purification center | जलशुद्धीकरण केंद्रासाठी निधी मंजूर

जलशुद्धीकरण केंद्रासाठी निधी मंजूर

Next

डोंगरेंच्या प्रयत्नांना यश : सोनी, चप्राडला मिळणार ५० लाख रुपये
लाखांदूर : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सोनी आणि चप्राड य्रेथे प्रत्येकी ५० लाख रुपये खर्चाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. लवकरच गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा होणार आहे. आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे यांनी अविरत चालविलेल्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सन २०१६ -२०१७ करिता राज्यस्तरीय योजना मंजूर समितीच्या २९ जून २०१६ रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आले असून लाखांदूर तालुक्यातील सोनी आणि चप्राड या दोन्ही गावासाठी जलशुद्धीकरण केंद्र मंजूर करण्यात आले आहे.या दोन्ही गावाना स्वतंत्र पाणी पुरवठा योजन आहे मात्र फिल्टर प्लांट नसल्याने नागरिकांना शुद्ध पिण्याचा पाणी मिळत नाही. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पाहता त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे यांनी प्रयत्न करून या दोन्ही गावाचा समावेश करू योजना मंजूर करवून घेतली.
सोनी येथे ५० लाख तर चप्राड येथे ५० लाख रुपये खर्चाचे जलशुद्धीकरण केंद्र मंजूर झाले आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे यांनी दिली आहे. त्यामुळे पाणी समस्या सुटणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fund sanction for water purification center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.