‘डायट’च्या उभारणीला निधीची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:19 AM2017-07-24T00:19:49+5:302017-07-24T00:19:49+5:30
भावी शिक्षकांना घडविण्याचे कायर करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अंधारात आहे.
२० कोटींचा प्रस्ताव : बांधकामाचा खर्च ४० टक्यांनी वाढला, शासन-प्रशासनाची उदासीनता
इंद्रपाल कटकवार। लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भावी शिक्षकांना घडविण्याचे कायर करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अंधारात आहे. चार वर्षांपूर्वी प्रसञतावित असलेल्या व पाऊण कोंटीचा खर्च झालेल्या या बांधकामाची किंमत सद्यस्थितीत ४० टक्यांनी वाढली आहे. कोट्यवधींची गरज असताना राज्य शासनाने निधीसाठी हात वार केले आहेत.
जिल्ह्यातील नावाजलेली प्रशिक्षण संस्था म्हणून डायटचा नेहमी उल्?ेख केला जातो. आजपर्यंत शेकडो प्रशिक्षणार्थी शिक्षक पदविका प्राप्त करून ज्ञानार्जन करण्याच्या कार्याला लागले. आजही शिक्षक घडविण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. शहरातील लाल बहादूर शास्त्री चौक परिसरात डायटची इंग्रजकालीन वास्तू आहे. सदर वास्तूची मालकी मात्र लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची आहे. ज्याप्रमाणे शास्त्री विद्यालयाच्या वर्गखोलींचे बांधकाम आहे, त्याचप्रमाणे डायटमधील खोल्यांचा आकार आहे. परंतू सदर इमारत जीर्ण झाली असून काही ठिकाणाहून तडे गेले आहेत.
भविष्यकालीन विचार व वाढता कामाचा व्याप याला अनुसरून जकातदार कन्या शाळा परिसरातील दक्षिण क्षेत्रातील जवळपास ५ एकरमध्ये डायटची नवीन प्रशाकीय इमारत बांधकामाचा चंग बांधण्यात आला.
यासाठी सन २०१३-१४ मध्ये यासंदर्भात अंदाजपत्रक व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.
सदर बांधकामासाठी १५ कोटी ३९ लक्ष ११ हजार रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याबी बाब प्रस्ताव होती. यापैकी केंद्राकडून बांधकामासाठी ८० लक्ष रूपये मंजूर करण्यात आले. निधी मिळताच जकातदार कन्या शाळेतच्या जागेत धडाक्यात बांधकामही सुरू झाले. पंरतू ऐनवेळी पुन्हा माशी शिंकली. पिल्लर उभे करून काही ठिकाणी भिंतीही उभारण्यात आल्या.
बांधकाम मोठया स्वरूपात असल्याने आलेला संपूर्ण निधी खर्च झाल्याने व पुढील खर्चासाठी निधी न आल्याने आजतागायत बांधकाम रखडलेले आहे. सद्यस्थितीत बांधकामासाठी २० कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. चार वर्षांचा कालावधी लोटूनही राज्य किंवा केंद्राकडून निधी न मिळाल्याने डिजिटायझेशनच्या माध्यमातून तंत्रस्रेही शिक्षक घडविण्यात जिल्हा माघारणार काय? अशी भितीही व्यक्त केली जात आहे.
बांधकामात या बाबींचा समावेश
जकातदार कन्या शाळा परिसरातील ५ एकर जागेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्येची नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. यात अत्याधुनिक वर्गखोल्या, पुरूष-महिला प्रशिक्षणार्थ्यांसाठी होस्टेल, कर्मचाऱ्यांसाठी वसाहत, अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण, सुरक्षा भिंत बांधकाम आदींचा समावेश आहे.
डायटच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. निधी मंजूर झाल्यास काम सुरू करण्यात येईल.
-अभयसिंह परिहार
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व
प्रशिक्षण संस्था भंडारा.