आरटीओ कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:13 PM2017-12-01T22:13:30+5:302017-12-01T22:14:04+5:30

जिल्ह्यातील रस्त्यांची दैनवस्था बघून आमदार डॉ. परिणय फुके यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निधीची मागणी लावून धरली होती.

Funds for construction of RTO office | आरटीओ कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी मंजूर

आरटीओ कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी मंजूर

Next
ठळक मुद्देपरिणय फुके यांच्या प्रयत्नाला यश

लोकमत आॅनलाईन
भंडारा : जिल्ह्यातील रस्त्यांची दैनवस्था बघून आमदार डॉ. परिणय फुके यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निधीची मागणी लावून धरली होती. त्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले असून रस्ते बांधकामासाठी तीन कोटी ३५ लाखांच्या निधीसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला आहे.
जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ नवेगाव, पिंपळगाव, भावड, ब्रम्ही, आसगाव, वलनी, खैरी, लोणारा, कुर्झा, इटगाव, चिचाळ रस्त्यांची चाळण झाली असून मार्गक्रमण करताना त्रास सहन करावा लागतो. वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी गावकºयांनी आमदार फुके यांच्या माध्यमातून बांधकाम विभागाकडे सातत्याने केली. परंतु निधी अभावी काम करता येत नसल्याचे विभागाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था व रस्त्यावर होणाºया अपघाताबाबत आ. फुके यांनी ना. चंद्रकांत पाटील यांना दिली.अनेक वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला भंडारा शहरामध्ये स्वत:ची इमारत नसल्यामुळे भाड्याच्या इमारतीमध्ये राहुन कार्यालयीन कामकाज करावे लागत होते. त्यामुळे त्याठिकाणी येणाºया नागरिकांना तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे आ. फुके यांनी ना. चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून चिचाळ-इटगाव रस्त्याच्या बांधकामाकरिता व उपप्रादेशिक विभागाच्या इमारत बांधकामाकरिता निधी देण्याबाबत मागणी केली. यावर ना. पाटील यांनी रस्त्याच्या बांधकामास ३.३५ कोटींचा निधी मंजूर करून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या इमारत बांधकामाकरिता सात कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंजुरीकरीता पाठवला. त्यामुळे चिचाळ-इटगाव रस्त्याच्या कामास सुरूवात होवून, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बांधकामास निधी प्राप्त होवून परिवहन कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामास सुरवात होईल, असे आ. फुके यांनी सांगितले.

Web Title: Funds for construction of RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.